माजी नगरसेवक एडवोकेट विलास आंबेकर यांनी तापोळा तालुका महाबळेश्वर येथील अस्तित्वात नसलेल्या शेत जमिनीचा बनावट दाखला देऊन त्या आधारे दोन नवीन मिळकती खरेदी केल्या होत्या याप्रकरणी सातारा जिल्हा सरन्यायाधीश बी एन निकम यांनी त्यांचा अंतरिम जामीन फेटाळला आहे . या प्रकरणाची सुनावणी दोन दिवसापूर्वीच पूर्ण झाली होती या प्रकरणाचे आदेश सोमवारी देण्यात आले .
सरकार पक्षाच्यावतीने एडवोकेट मिलिंद लोक तर बचाव पक्षाच्या वतीने एडवोकेट शामाप्रसाद बेगमपुरे यांनी न्यायालयाचे कामकाज चालवले . याबाबतची अधिक माहिती अशी एडवोकेट विलास आंबेकर यांनी तापोळा येथे अस्तित्वात नसलेल्या शेतजमिनीचा बनावट दाखला जोडून मुलगी ऋतुजा आंबेकर व सून प्रियंका रोहन आंबेकर राहणार 512 अयोध्या अपार्टमेंट सदर बाजार यांच्या नावे ठोसेघर येथे जमीन खरेदी केली होती याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी कागदपत्रांच्या पुराव्यासहित तत्कालीन तहसीलदार राजेश जाधव यांच्याकडे तक्रार दिली होती .या तक्रारी संदर्भात तहसीलदार महाबळेश्वर व तहसीलदार सातारा यांच्याकडे चौकशीचे आदेश देण्यात आले चौकशीअंती तापोळा येथे गट नंबर 20/1 ही जमीनच अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. तहसीलदार जाधव यांनी सहाय्यक दुय्यम निबंधक गोडोली यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेशित केले होते त्यानुसार भारतीय दंड संहिता 420 465 467 471 व स्टॅम्प अॅक्ट प्रमाणे ऋतुजा आंबेकर व प्रियांका रोहन आंबेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला . मात्र या प्रकरणांमध्ये एडवोकेट विलास आंबेकर यांनी मुलगी व सूनेच्या नावाने अंतरिम जामीन मिळवला होता . या जामीन अर्जावर दोन दिवसांपूर्वीच सुनावणी प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकरण निकालावर ठेवण्यात आले होते सातारा जिल्हा सरन्यायाधीश बी एन निकम यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एडवोकेट विलास आंबेकर यांच्यासह दोघांचा अंतरिम जामीन फेटाळला आहे .
बचाव पक्षाच्या वतीने एडवोकेट शामाप्रसाद बेगमपुरे यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील ऍडव्होकेट मिलिंद ओक यांनी न्यायालयाचे कामकाज चालवले . सदर बाजार पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक व्ही एस जगताप व हवालदार संजय खाडे यांनी या खटल्यात सहकार्य केले