कोरोना च्या पार्श्वभूमीवर यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आ मकरंद पाटील

173
Adv

महाबळेश्वर-वाई-खंडाळ्याचे कार्यसम्राट आमदार मकरंद पाटील हे कोरोना, अतिवृष्टीच्या सावटामुळे आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

सद्या सर्वत्रच कोरोनाचे सावट आहे. सातारा जिल्हाही त्याला अपवाद नाही. त्यातच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमिवर आ. मकरंद पाटील हे, त्यांचा गुरूवार दि. २९ ऑक्टोबर रोजी होणार वाढदिवस साजरा करणार नाहीत. वाढदिवसाला करणाऱ्या खर्चा ऐवजी कार्यकर्त्यांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी साहित्यरूपी मदत तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन आ. पाटील यांनी केले आहे. आ. मकरंद पाटील यांचा वाढदिवस हा कार्यकर्त्यांसाठी एक नवचैतन्य असते. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक यासह विविध उपक्रमांनी आ. पाटील यांचा वाढदिवस कार्यकर्ते दरवर्षी जल्लोषात साजरा करतात. वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील हजारो कार्यकर्ते सकाळपासूनच आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी साताऱ्यातील घरी गर्दी करतात. त्यानंतर वाई, महाबळेश्वर, खंडाळा येथील कार्यक्रमांना आ. मकरंद पाटील हजेरी लावतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आ. पाटील यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आ. पाटील यांनी स्वत: कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची भिती न बाळगता लॉकडाऊनच्या काळात आ. पाटील यांनी मतदार संघात पायपिट केली होती. गोरगरीबांना सर्व प्रकारची मदत केली.

किराणा साहित्य, औषधे व इतर साहित्याची मदत केली. कोरोना सेंटर्सला भेट देवून अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यामुळे आ. पाटील हे खऱ्या अर्थाने कोरोना योध्दा ठरले आहेत. आ. पाटील यांचे वडील माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील हे तळागाळातील कार्यकर्त्याला कधीही विसरले नाहीत. त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला ते धावून जायचे, अगदी तोच वारसा आ. मकरंद पाटील हे आजही सक्षमपणे चालवीत आहेत. अगदी परवा झालेल्या अतिवृष्टीनंतर आ. मकरंद पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली व अधिकाऱ्यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. आ. पाटील हे नेहमीच कार्यकत्यांर्च्या सुखदुखात सहभागी असतात, म्हणुणच कार्यकर्त्यांनी त्यांना जननायक ही पदवी बहाल केली आहे. राज्यातील सर्वात मोठ्या मतदार संघाचे आ. पाटील हे नेतृत्व करत आहेत. अगदी दुर्गम, सुबत्ता असलेला व दुष्काळी भागाचे नेतृत्व ते करत आहेत. सर्वच भागाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न आ. पाटील यांच्याकडून होत आहे.

Adv