सातारा जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यासह विधानसभेचे दीपक पवार, मकरंद पाटील यांनी आपले अर्ज दाखल केले.
उशिरा खासदार शरद पवार यांची सातार्यात एंvटी झाली. खा. पवार हे अचानक सातार्यात दाखल झाल्याने राजकीय वर्तृळात जोरदार चर्चा रंगली होती.
यावेळी खासदार पवार यांनी दिवसभराच्या घडामोडीचा आढावा घेतला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे,सारंग पाटील, सुरेंद्र गुदगे, प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे, सुभाष शिंदे, नाना मोरे, राष्ट्रवादी चे सुनिल माने,बाळासाहेब सोळस्कर,राजकुमार पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.