पन्नास वर्षापासून छोटामोठा व्यवसाय करुन पोट भरणाऱ्या ३५ कुटूंबांना केवळ दोनदा नोटीसा देऊन मेडिकल कॉलेजच्या नावाखाली त्यांच्या घरादारावर (नांगर) फिरवून बेघर करणारे कृष्णाखोरे विभाग जलसागर ढाब्यावर ११ वर्ष मेहरबान का ? असा परखड सवाल लोकजनशक्तीचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांनी आंदोलनावेळी उपस्थित केल्याने जलसागरची आंबळी खाणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र उलट्यांचा त्रास होऊ लागल्याचे चित्र कृष्णाखोरे जलसिंचन विभागात निर्माण झाले आहे.
न्याय सर्वांना समानच द्या या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर तिव्र निदर्शने केली. त्या वेळी ते बोलत होते.कण्हेर जलाशया शेजारील आकले गावच्या हद्दीतील गट नं. ६२ मधील ०.२० आर क्षेत्र सन २००५ साली धोम पाटबंधारे विभाग (सध्याचा कृष्णा खोरे जलसिंचन विभाग सातारा) कडून अरुण बाजीराव कापसे रा. माळेवाडी ता.जि.सातारा यांना घरगुती खानावळ व्यवसायासाठी ५ वर्ष मुदतीत दिली होती. तसे प्रतिज्ञापत्र अरुण कापसे यांनी कृष्णा खोऱ्याला सादर केले होते. हॉटेल व्यवसायीकाला जलसिंचन विभागाने भाडेपट्टा करार करतेवेळी काही नियम अटी दिल्या होत्या. त्यामध्ये सदर जागा ५ वर्षासाठी भाडे करारावर असेल. सदर जागेत पक्के बांधकाम करता येणार नाही. जागेचा विस्तार करता येणार नाही. महामंडळाला जेव्हा ती जागा हवी असेल त्या वेळी कारण न सांगता मालकाने सदर जागा मोकळी व स्वच्छ करुन देण्याचे असे स्पष्ट असताना पाच वर्षानंतर आज अखेर ११ वर्ष खोरे जलसिंचन विभाग गांधारीगा पाच वर्षानंतर पुन्हा ती जागाला मुदत वाढ मिळावी म्हणून सदर मालकाने ३० / ४ / २०१० साली ‘खोऱ्याकडे अर्ज केला होता मात्र “कृष्णा’ मंडळाने न्यायालयीन प्रक्रीयेमुळे नवीन करार होऊ शकत नाही. असे त्यांना कळविले होते. म्हणजेच सदर जागा हॉटेल मालकाने कारण न देता मोकळी व स्वच्छ करून देण्याचे बंधनकारक असताना ११ वर्ष नेमकी कोणत्या अधिकाऱ्याने हप्तेखोरी केली त्याचे वरही कारवाईची मागणी लोकजनशक्ती पार्टीने केली आहे.दिवाळीच्या बोनस सह हप्ता हप्त्याला अथवा महिन्याला घेणाऱ्या अधिकाऱ्याने खोऱ्यानं पैसा ओढल्यानेच त्याच्या बुद्धीचे दिवाळे काढण्यासाठी या वर्षी दिवाळीतच पुणे विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशार गायकवाड देत असतानाच पैलवानांना, गुंडापुंडांना आम्ही भिक घालत नसल्याचे जाहिर केले आहे. जावक क्र.कृ.सि.वि./ प्रशा- १/४६८८/२०२१ पत्रान्वये आश्वासन न देता ३५ कुटूंबांचे पुनर्वसन करा अथवा जलसागर वर डोझर फिरवा अन्यथः राजकीय पाठबळावर चोर शिरजोर होत असेल तर आम्ही संविधानीक मार्गाने लढा तिव्र करु असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.
Sc. St. सेलचे प्रेमानंद जगताप, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत मतकर, कामगार आघाडीचे हेमंत गायकवाड, युथ जिल्हा कार्याध्यक्ष मा.करण गायकवाड, उपाध्यक्ष रणजित कसबे मार्गदर्शक रोहीत मिश्रा, महिला आघाडी उपाध्यक्षा प्रियांका भोसले, सांनी केले यावेळी मुनीर शेख, जावेद मुलाणी, जय पवार, बालाजी अडसूळ, अजीज पठाण, विजय नवले, विशाल गायकवाड, ओमकार गायकवाड, सौरभ गायकवाड, राहुल घोडके सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.