पालिका सभागृहात आज पहिल्यांदाच पाऊल ठेवल्यानंतर नगरसेविका हेमलता सागर भोसले यांनी छत्रपती शिवरायांच्या व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हात जोडून अभिवादन केले त्यांच्या या कृतीने सर्वांची मने जिंकली
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या पदभाराचा सोहळा आज संपन्न झाला यावेळी सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते मात्र नगरसेविका हेमलता सागर भोसले पलिका सभागृहात येताच सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपल्या कामाची सुरुवात केली त्यांच्या या कृतीने सातारकर यांची मने जिंकली असून प्रथम वंदन छत्रपती शिवरायांना करून कामकाज सुरुवात करणार असल्याचे नगरसेविका हेमलता भोसले यांनी सांगितले
नगरसेविका हेमलता भोसले यांचा आदर्श वाखाण्याजोखा असून इतर नगरसेविकांनीही याचा आदर्श घेतला पाहिजे






