व्यापार्‍यांप्रमाणेच सातार्‍यातील सर्व मिळकतधारकांना घरपट्टीत सवलत मिळावी आ. शिवेंद्रसिंहराजे;

49
Adv

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात सर्व कारखाने, व्यवसाय, व्यापार आणि दुकाने यासह इतर सर्व प्रकारचे उद्योगधंदे बंद होते. वडापाव, पानटपरी, हातगाडे यासारखे े सर्वच छोट उद्योग बंद होते. सातारा पालिकेने व्यापार्‍यांसाठी तीन महिन्यांची घरपट्टी माङ्ग करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय चांगला आणि स्वागतार्ह आहे. लॉकडाऊनमध्ये व्यापार्‍यांप्रमाणेच सातार्‍यातील सर्वच मिळकतधारकांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यापार्‍यांप्रमाणे सर्वच मिळकतधारकांना घरपट्टीत सवलत मिळणे आवश्यक असून व्यापार्‍यांना लागू केलेला निर्णय सर्व मिळकतधारकांना लागू करावा, अशी रास्त मागणी करतानाच आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबतचा ठराव पालिकेने करावा, त्याला नगर विकास आघाडी बिनशर्त पाठिंबा देईल, असेही म्हटले आहे.  

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे देशासह संपुर्ण राज्यात आणि सातारा जिल्ह्यातही लॉकडाऊन होता. या लॉकडाऊनच्या काळात सर्वप्रकारचे उद्योगधंदे, व्यवसाय, व्यापार उदीम आणि सर्वच प्रकारची दुकाने बंद होती. यामुळे व्यावसायिक, नोकरदार, रोजंदारी आणि हातावरचे पोट असणार्‍या गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. या सर्वांनाच दिलासा मिळणे अपेक्षित आहे. सातारा पालिकेने शहरातील व्यापार्‍यांना तीन महिन्यांची घरपट्टी माङ्ग करण्याचा चांगला निर्णय घेतला असून यामुळे व्यापार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. व्यापार्‍यांप्रमाणेच सर्व प्रकारचे व्यवसाय बंद होते. नोकरदारांचे पगार बंद होते. अनेकांच्या नोकरीवर गदा आली. मजूर आणि हातावर पोट असणार्‍यांचे अतोनात हाल झाले. मोठमोठ्या दुकानांप्रमाणेच हातागाडे, पानटरपी, ङ्गेरीवाले, वडापाव, चहावाले अशा असं‘य लोकांचे छोटे- छोटे व्यवसाय बंद होते. त्यामुळे अशा लोकांना कर भरणे शक्यच नव्हते. याचाही विचार पालिकेने करावा. त्यामुळे व्यापार्‍यांसाठी घेतलेला योग्य निर्णय पालिकेने सातार्‍यातील सर्वच मिळकतधारकांसाठी लागू करावा आणि सर्व मिळकतधारकांना लॉकडाऊनच्या कालावधीतील घरपट्टीमध्ये सूट द्यावी.

व्यापार्‍यांप्रमाणेच इतर सर्वच व्यावसायिक, उद्योजक, लघु उद्योजक, नोकरदार यांचे लॉकडाऊनमुळे हाल झाले. सातारा पालिकेने चांगला निर्णय घेवून व्यापार्‍यांना घरपट्टीमध्ये सवलत दिली आहे. व्यापार्‍यांप्रमाणेच इतर मिळकतधारकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे हा निर्णय व्यापार्‍यांप्रमाणेच सातार्‍यातील सर्वच मिळकतदारांना लागू करुन सर्वांना घरपट्टीमध्ये सवलत देवून दिलासा द्यावा. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करावा. नगर विकास आघाडी या ठरावाला बिनशर्त पाठिंबा देईल, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

चौकट— हद्दवाढीत समाविष्ट भागाचाही विचार व्हावा
लॉकडाऊनचा ङ्गटका सातारा शहराप्रमाणेच हद्दवाढीत नव्याने समाविष्ट झालेल्या सर्वच भागातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार यांच्यासह सर्वांनाच बसला आहे. सातारा पालिकेने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतानाच आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पालिका हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नवीन भागाकडेही पालिकेने लक्ष देण्याची मागणी केली आहे. घरपट्टी वाडीचा निर्णय घेताना पालिकेने नवीन भागाचाही विचार करावा, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. 

Adv