मराठा समाजाचा उन्नती करण्यासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेबाबत तातडीने योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही करावी तसेच कोयना धरण व अभयारण्यग्रस्त लोकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आज केली
छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण व संशोधन मानव विकास संस्था सारथी या संस्थेची स्वयत्ता खंडित होता कामा नये यासाठी प्रयत्न करावेत छत्रपती शाहू महाराज यांचे जिवंत स्मृती स्मारक सारथीच्या रुपाने उभे असल्याने त्यांचे काम पूर्वीप्रमाणेच सुरू राहावे सारथी ला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी नोकर भरती झाली पाहिजे सारथी संस्थेचा निधी परत गेला तो कसा गेला त्याची चौकशी व्हावी व संस्थेचे व सर्व संचालकांच्या चौकशीचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी आवश्यक तरतूद आणि संशोधन शिष्यवृत्ती चा प्रश्न निकाली काढावा असे ही त्याप्रसंगी आग्रही नमूद केले आहे
कोयना धरणग्रस्तांच्या बाबतीत बरीच हेळसांड झाली आहे धरण होऊन सुमारे 60 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे अद्यापही पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही पुनर्वसन पात्र धरणग्रस्त व अभयारण्य ग्रस्तांची यादी तयार करावी बोगस लाभार्थी शोधून काढावेत कोयनेचे पाणी ज्या ठिकाणी पर्यंत पोहोचत नाही त्या ठिकाणी पुनर्वसन करावे पुनर्वसन आतील जमिनीचे सिंचन सोय करण्यात यावी पुनर्वसन होईपर्यंत निर्वाह भत्ता मिळावा इत्यादी समस्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना मांडल्या
तसेच या सर्व प्रश्नांची तातडीने दखल घेतली जाईल आणि त्याबद्दल केलेली कारवाई शक्य तितक्या लवकरच आपणास मंत्रालय स्तरावरून आणि व्यक्तिगत स्वरूपात कळविले जाईल असे आश्वासन या प्रसंगीं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर येथील निवासस्थानी वडेट्टीवार यांनी सदिच्छा भेट दिली त्या वेळी विविध विषयांवर दिलखुलास चर्चा झाली