क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनांक 3 जानेवारी रोजी साजरी होत असून ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दोन वेळा पाहणी केली तर पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी एकत्रितपणे पाहणी केली या तीनही मंत्र्याच्या पाहणी दौऱ्यात समन्वयाचा अभाव कमी पडला असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे
L ग्रामविकास मंत्री हे सातारा जिल्ह्यातीलच पालकमंत्री व मदत पुनर्वसन मंत्री हेही सातारा जिल्ह्यातील मात्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नियोजनासाठी ग्रामविकास मंत्री गोरे यांनी दोन वेळा स्वतंत्र पहाणी केली तर दुसरीकडे पालकमंत्री देसाई व मंत्री मकरंद आबा यांनी एकत्रितपणे पाहणी केली त्यामुळे महायुतीतील मंत्री महोदयांमध्येच समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येते
ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी दगडे खाल्ली त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शासनाच्या मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने नक्की ही लढाई श्रेय वादाची आहे का पक्षीय हे कळायला मार्ग नाही.. जरी पाहणी आपापल्या दौऱ्यानुसार केली असली तरी तिन्ही मंत्र्यांनी एकत्रितपणे पाहणी केली असती तर जिल्ह्याला एक आगळावेगळा संदेश मिळाला असता हे मात्र नक्की






