केवळ श्रेयासाठी लक्षवेधी नव्हे तर लक्ष छेद सूचना… छ उदयनराजे भोसले

281
Adv

54 गावांना, पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी मंजूर करुन घेतलेला बोडारवाडी प्रकल्प आता पिण्याचे पाणीआणिशेती सिंचन अश्या दोन्ही कारणासाठी सिंचन विभागा मार्फत राबविणे ची केलेली मागणी म्हणजे 54 गांवांना पिण्याच्या पाण्या साठी वंचित ठेवण्याचा प्रकार आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्या बद्दल आम्हास श्रेय जाईल म्हणून सिंचनाचा तिढा लक्षवेधी सूचना मांडून टाकण्यात आला आहे.सिंचनाचा विषय बोंडारवाडी धरणामध्ये घेतल्यास कृष्णा खारे लवादामध्ये हा प्रश्न भिजत पडून,54 गावांना पिण्याच्या पाण्यापासून आणखी अनेक वर्षे वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यावर,सिंचनासाठी पाणी वापर करण्याचे नियोजन केल्यास, प्रकल्प पूर्ण होण्याबरोबरच सिंचनाला देखिल पाणी उपलब्ध होईल पाहीजे तर श्रेय घ्या परंतु श्रेय-वादामध्ये बोंडारवाडी प्रकल्प अडकवू नका अशी प्रतिक्रीया खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

बोडारवाडी प्रकल्पामधुन सिंचनाकरीता पाणी उपलब्ध होत नसल्याने,सन 2018 मध्ये शासनस्तरावरुन पिण्याच्या पाण्याचे,
पाणी आरक्षण आम्ही मंजूर करुन घेतले. त्यामुळे जावळी तालुक्यातील 54 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गीलागणार होता.त्यामध्ये आवश्यक ते प्रमाणे भुसंपादनाची जमिन आमच्या मालकीची असताना सुध्दा लोकांना पाणी मिळेल या भावनेने, सदर प्रकल्पाच्या भुसंपादनासाठी आमची जमिन आम्ही उपलब्ध करुन दिली. त्या अनुषंगाने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या निधी मधुन जलसंपदा विभागामार्फत धरण बांधण्याबाबत शासन स्तरावरुन आम्ही जरुर तो पाठपुरावा करुन आवश्यक त्या मंजु-या प्राप्त करुन घेतल्या. सन 2018 मध्ये सदर धरणाच्या ट्रायलपिट घेणेबाबतची निविदा कार्यवाही पूर्ण केली.धरणासंबंधी ग्रामस्थ व प्रशासनासोबतवेगवेगळया बैठका घेवून,सुसंवाद साधत,धरणाचे काम सुरु केले 54 गावांचा पिण्याचा प्रश्न सुटतोय आणि त्याचे श्रेय आम्हास मिळते या आणि याच असुयेपोटी काही व्यक्तींनीकाही व्यक्तींना पुढे करुन,बॉडारवाडी प्रकल्पाची सुरु झालेली प्रक्रीया बंद ठेवण्यास शासनाला प्रवृत्त केले.त्याचवेळी धरणाचे काम सुरु राहीले असते तर आज ते पर्ण होवून 54 गावातील लोकांच्या घरापर्यंत पिण्याचे शुध्द व मुबलक पाणी पाहोचले असते. परंतु विघ्नसंतोषींना ते बघवणारे नव्हते. आता आम्ही या बोंडारवाडी धरणाच्या कामास सुरुवात करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत याची कुणकुणलागताच केवळ श्रेयाकरीता लक्षवेधी व्दारे सिंचन विभागा मार्फत काम करावे असा आग्रह काहींनी धरला आहे.पिण्याचे पाणी आणि सिंचन असे दोन्ही हेतु साध्य करण्याचा प्रयत्न एकाचवेळी झाल्यास, कृष्णा खोरे सिंचन लवादामध्ये हा प्रकल्प निश्चितपणे अडकुन पडणार आहे.धरणाचे काम पूर्ण होवून पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटल्यावर उपलब्ध शिल्लक पाणी तांत्रिकदृष्टया लवादामध्ये न अडकता सिंचनासाठी वापरता येणार आहे. म्हणूनच प्रथम पिण्याच्या पाण्याची तहान भागवून घेतल्यावर, नंतर धरणातील शिल्लक उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी वापर करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहेत.तसे प्रयत्न आमचे सुरु आहेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देवून मंजूर असलेल्या ट्रायलपिट आणि रेखांकनानुसार पिण्याच्या पाण्याचे धरण बांधणे
हे लोकहित आणि सामान्य जनतेच्या दृष्टीने लाभकारक आहे.
बोंडारवाडी प्रकल्पाची धग 2010 पासून सुरु असताना,आज इतक्या वर्षानी लक्षवेध घेण्यासाठी वेळ मिळणे आणि सिंचन विभागाकडूनच हा प्रकल्प व्हावा असा आग्रह तांत्रिकदृष्ट्या अयोग्य ठरणार आहे. केवळ बोंडारवाडीचे श्रेय आपल्यलाच
मिळावे यासाठी हा आटापिटा आहे.अश्या भुमिकेमुळे परंतु 54 गावातील रहिवासी पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत.त्यांची मागणी पहाता आम्ही सुरु केलेल्या बोंडारवाडी धरणालाच खो घालण्याचा हा प्रकार सुध्दा असु शकतो. बोंडारवाडी धरणाखाली सर्वांत जास्त एकर क्षेत्राची जमिनआमची जाणार आहे.परंतु जनसामान्यांची तहान भागवण्यासाठी आम्ही लागणारी जमिन देत आहोत. कोणत्याही परिस्थितीत बोंडारवाडी धरण तांत्रिकदृष्टया योग्य असणा-या विभागाकडून पूर्ण करुन, 54 गावांची तहान भागवण्यास आम्ही कटीबध्द आहोत अशी प्रतिक्रीया खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

Adv