ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर

52
Adv

 माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापीत ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्षक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
            या जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनाक 23 ते 30 डिसेंबर, 25, 26 व 27 डिसेंबर सार्वजनिक सुट्टी वगळून. नामनिर्देशन छाननी करण्याचा दिनांक 31 डिसेंबर, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत. मोतमोजणीचा दिनांक 18 जानेवारी 2021. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक 21 जानेवारी.

Adv