राज्यातील ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनाकडून अ ब क ड श्रेणीनुसार मानधन दिले जाते सदरचे मानधन करोणामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वितरित करण्यात आलेले नाही ते त्वरित वितरित करावेच तथापि भविष्यात सदरचे मानधन नियमित वेळेत मिळावे राज्यातील नाट्यगृहे आणि ग्रंथालय पुरेशी सुरक्षा घेऊन त्वरित सुरू करणे बाबत तातडीने निर्णय घ्यावा यास तमाशा बारी लोका कलावंतांची दैनंदिन जीवन करोणामुळे असह्य झाले आहे त्या लोक कलाकारांना शासनाने भरीव मदत करावी अशा मागण्या सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे अशी माहिती जलमंदिर येथील सूत्रांकडून मिळाली आहे
राज्यशासन ज्येष्ठ कलाकारांना त्यांच्या पात्रता नुसार ठराविक मानधन प्रदान करीत असते तथापि सदर चे मानधन covid-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर संबंधित ज्येष्ठ कलाकार व्यक्तींना वितरित करण्यात आलेले नाही सदरचे मानधन तोकडे असले तरी मावळतीचा सूर्य बघत असलेल्या ज्येष्ठ कलाकारांना त्याचा मोठा आधार असल्याने एक रकमी राज्यभरातील सर्व संबंधितांना तातडीने प्रदान करण्याची कार्यवाही करावी अशी विनंती सूचना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका विशेष पत्राने केली आहे