भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्याजहरी टीकेनंतर, विविध राजकीय पक्षातून प्रतिक्रिया आल्या. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांनीही पडळकर यांच्या वक्तव्याचा
निषेध केला. त्यानंतर आता भाजपमध्ये गेलेले श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचीही प्रतिक्रिया आली आहे.
कोणी कोणाबद्दल काय बोलले हे त्यांनी मला विचारुन बोलले नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. शरद पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील”, असं उदयनराजे भोसले म्हणाले. ज्यांनी कुणावर टीका केली, त्याच्यावर त्यांना त्यांना विचारा. मी परखडपणे माझं मत मांडत असतो. ते जे कोणी बोलले ते मला विचारुन बोलले नाहीत. जे कुणी उत्तर देणार आहेत, ते मला विचारुन देणार नाहीत,असं उदयनराजेंनी नमद केलं.
कोरोना परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं.साताऱ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्याबाबत विचारलं असता, कोरोनाचा बाऊ केला जात आहे, असं उदयनराजे म्हणाले. हर्ड इम्युनिटी वाढवण्याची गरज”ज्या पद्धतीने स्वीडनमध्ये हर्ड इम्युनिटी अर्थात सामाजिक रोगप्रतिकारशक्ती केली आहे, त्या पद्धतीने भारतात केली जावी. कारण इतर व्हायरसप्रमाणे कोरोना हा व्हायरस आहे, त्याचा बाऊ करु नये. इतर आजारात देखील अनेकांचा मृत्यू होतो. लोकांना
घाबरवू नका, लोकांना वस्तूस्थितीला सामोरे जावे लागेल. लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता किती वेळा लॉकडाऊन करणार” असा सवाल उदयनराजेंनी विचारला. कोरोना बाबत लोकांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
विठ्ठलाला साकडं
पंढरपूरला आषाढी एकादशीला देवाला साकडे घालण्यासाठी मी जाणार होतो, पण सध्याचा परिस्थितीमुळे मी जाऊ शकत नाही. पण देवाला एकच साकडे घालीन की या परिस्थितीत राजकारण करु नका, सगळ्यांनी एकत्र येऊन लोकांचा विचार
करावा. महाराष्ट्राने दिशा देण्याचे काम केले आहे.आताच्या परिस्थितीत सुद्धा राज्याने पाऊल उचलून त्याचे अनुकरण इतर राज्यांनी केले पाहिजे, असं उदयनराजे म्हणाले.