लोकसभा विधानसभा निवडणूक या निवडणुकांमध्ये पडद्याच्या मागे राहून काम करणारे अनेक कार्यकर्ते असतात. नेत्यांसाठी राबलेल्या अन् झटलेल्या कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाची गरज यामुळे व्यक्त होत आहे.अशाच पडद्यामागे राहून काम करणाऱ्या सुनील काटकर यांना विधान परिषदेवर संधी मिळावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
खासदार छ उदयनराजे भोसले यांचे विश्वासू कार्यकर्ते असलेले सुनील काटकर हे जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती होते. मात्र,जिल्हा परिषदेला पडणाऱ्या आरक्षणामुळे कधी संधी मिळते,तर कधी मिळत नाही.यामुळे चांगले | राजकारण आणि लोकांमधला चांगला संपर्क असूनदेखील कामाची संधी मिळत नाही अशा कार्यकर्त्यांना नेते आणि पक्षानेही संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सुनील काटकर यांनी सातारा जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील सहाही उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत रणनीती आखली होती. सर्वच्या सर्व जागा निवडून आणणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता त्या पद्धतीने काम करून त्यांनी सर्वच उमेदवारांचा चांगला प्रचार केला. नियोजनाप्रमाणे जिल्ह्यात महायुतीचे आठही उमेदवार निवडून आले. पडद्यावरच्या उमेदवारांचा विजय झाला;
पण पडद्यामागील कार्यकर्त्यांचाही विचार झाला पाहिजे, अशी मागणी आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.