छत्रपती शिवरायांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या काडीला सुद्धा धक्का लावायचा नाही मात्र इथं पूर्ण संसार पुरामध्ये उध्वस्त झाला असून नक्की सातारा जिल्हा पूरग्रस्तांना किती मदत करेल याकडे आता लक्ष लागले आहे सातारा जिल्ह्यात मोठमोठे उद्योजक आहेत मोठ्या संस्था आहेत जिल्हा बँक असे अनेक संस्था आपल्याकडे असून यातून मोठी मदत व्हावी हीच शेतकऱ्यांचे अपेक्षा दिसते
मराठवाडा,विदर्भ वर आलेल्या संकटाला मदत करण्यासाठी सातारा जिल्हा उभा राहणार का याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले असून नक्की कोण कोण मदत करणार याकडे उत्सुकता लागली आहे
छत्रपती शिवरायांनी अखंड महाराष्ट्र एकसंघ ठेवला त्याच महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ वर अस्मानी संकट कोसळले असून छत्रपतींचा जिल्हा असलेला सातारा जिल्हा हा पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अग्रेसर राहील का याकडे लक्ष लागले आहे
पुरामध्ये पूर्ण संसार होऊन गेला, गाई म्हशी,शाळेतील वही पुस्तके ही वाहून गेली हे सर्व पूर्ण उभा करण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सातारा जिल्ह्याने मदत करावी व आपण छत्रपतींचे पाईक आहोत हे सिद्ध करण्याचे पुन्हा हीच ती वेळ असल्याचे दिसून येते