फलटण येथे पासपोर्ट सेवा केंद्र उभारा

28
Adv

माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण व अकलूज शहरात पासपोर्ट सेवा केंद्र (पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र – POPSK) स्थापन करण्याची मागणी केली.

पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने खासदार मोहिते पाटील हे सध्या दिल्लीत असून याचबरोबर मतदारसंघात नवीन पोस्ट ऑफिसेस सुरू करण्यासंदर्भात मागणी केली. असून ग्रामीण भागात डाक सेवांचा विस्तार व्हावा,अनेक गावांमध्ये पोस्ट ऑफिसच्या सुविधांचा अभाव आहे, ज्यामुळे स्थानिकांना बँकिंग, पत्रव्यवहार आणि इतर डाकसेवा उपलब्ध होत नाही आशा ठिकाणी पोस्ट ऑफिसेस सुरू झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल.

याचबरोबर मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या दूरसंचार समस्या मांडल्या. मोबाईल नेटवर्कच्या अभावामुळे त्रस्त असलेल्या गावांमध्ये BSNL ची सेवा त्वरित सुरू करावी,अशी मागणी केली. तसेच, इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात यावी व डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवावी, यासाठीही निवेदन दिले. ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव शिक्षण, आरोग्य आणि प्रशासनाशी निगडित सेवांमध्ये अडथळा निर्माण करतो. त्यामुळे BSNL सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी सेवा देणे आवश्यक आहे. अशी मागणी केली.

या सर्व मागणीसंदर्भात माननीय केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या प्रस्तावा बाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

Adv