पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढु नये ही देवा भाऊंची इच्छा?

522
Adv

गेल्यादोन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार गोरे यांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपची पीछेहाट झाली अशी चर्चा माढा सोलापूर साताऱ्यात दबक्या आवाजात असली तरी दस्तुरखुद्द भारतीय जनता पार्टीचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्रात वाढलेली पाहायची नाही का अशी शंका आता उपस्थित झाली आहे

फलटण येथे बोलताना माजी विधानपरिषद सभापती राम राजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट सांगितले की विदर्भातील भाजपा वेगळी देवेंद्र फडणीस यांची भाजप वेगळी पश्चिम महाराष्ट्रातील भाजपवेगळी नक्की bjpपक्षाची वाढ कोणाला नको अशी शंका आता उपस्थित झाली आहे

माजी खासदार रणजीतनाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या सांगण्यावरून माढा लोकसभा मतदारसंघासाठी तब्बल एक महिना आगोदर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली तसेच सोलापूर लोकसभेसाठी आ गोरे यांच्या विधानसभेतील सदस्य असलेले राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिशाभूल करायची खोटा रिपोर्ट पाठवायचा पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सगळी ओके आहे असं कान मंत्र देऊन बाहेर पडायचे असेही श्रीमंत रामराजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी म्हणाले होते प्रत्यक्षात मात्र आता भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्रात वाढण्याऐवजी गळून पडण्यातच धन्यता मानू लागली याला नक्की जबाबदार कोण याची भाजप व तेथील नेते करणार का

भाजपापासून एक एक नेते दुरावत गेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारखे बलाढ्य नेते भारतीय जनता पार्टी पासून दुरावले गेले, हर्षवर्धन पाटील,समरजीत सिंह घाडगे हे दिग्गज नेतेही भाजप पासून दूर होताना आपल्याला दिसून येत आहेत माढा व सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांनी भाजपपासून हरकत घेतली नसतीतर दोन खासदार नक्कीच भाजपचे वाढले असते मात्र त्या दोघांमुळेच भारतीय जनता पार्टीची पश्चिम महाराष्ट्रात वाट लागली अशी चर्चा माढा, सोलापूर, सातारा लोकसभा मतदारसंघात जोरदार रंगू लागली आहे यावर काहींनी स्पष्ट आपली भूमिका ही जाहीर केली आहे लोकसभेचा अनुभव घेता विधानसभेला भारतीय जनता पार्टीला या सर्व गोष्टींकडेगांभीर्याने घेणार का की कमळाची पाने गळून गेल्यानंतरच भाजपला जाग येणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत

त्या दोघांच्या सल्ल्यानेच जर भाजप नेते चालून राहिले तर पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची वाट बिकट होणार यात तीळ मात्र शंका नसून राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना अजूनही आपला पक्ष पश्चिम महाराष्ट्रात वाढायला नको हीच तर देवा भाऊंची इच्छा नाही ना अशी शंका आता उपस्थित झाली आहे

Adv