मिनी औद्योगिक वसाहतीसाठी मोहिते-पाटील बंधूंचे मंत्री उदय सामंताना निवेदन

318
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

माळशिरस तालुक्यातील सदा तालुक्यातील सदाशिवनगर येथे शेतीमहामंडळाच्या उपलब्ध २१० एकर जागेवर मिनी औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्याच्या संदर्भात आज मुंबई विधान भवन येथे उद्योगमंत्री मा.उदय सामंत साहेब यांची आ.रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली व तसेच निवेदन दिले.

सन २०११ च्याजणगणनेनुसार माळशिरस तालुक्याची लोकसंख्या सुमारे ४,८५,६४५ इतकी असून आजपर्यंतची वाढती लोकसंख्या लक्षात घेता तालुक्यामध्ये सुशिक्षीत बेरोजगारांचे प्रमाण वाढलेले असून येथे मिनी औद्योगिक वसाहत होणे अत्यंत गरजेचे आहे. मौजे सदाशिवनगर येथील शेती महामंडळाच्या मळ्यातील २१० एकर क्षेत्र शिल्लक आहे.

सदरची जमीन ही शेतीमहामंडळाची असलेने इतर शेतक-यांची जमीन संपादित करावी लागणार नाही. तसेच महामार्गालगत असलेने दळणवळणाचे दृष्टीने सोईचे होणार आहे. मिनी औद्योगिक वसाहतीसाठी लागणा- या पाण्याची उपलब्धता ही निरा उजवा कालवा लगतच असलेने सोईचे होणार आहे.

माळशिरस तालुक्यालगत सातारा जिल्ह्यातील माण व फलटण हे तालुके लगत असून या तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांना ही रोजगार व उद्योजकांना संधी उपलब्ध होईल त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल.

तरी माळशिरस तालुक्यतील सदाशिवनगर येथील शेतीमहामंडळाच्या मळ्यातील जमिनीमध्ये मिनी औद्योगिक वसाहत मंजूर करणेबाबतचा प्रस्ताव मा. महाव्यवस्थापक, भूसंपादन, मुंबई यांचेकडे मान्यतेसाठी प्रलंबीत असून सदर प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करणेबाबत संबधीतास आपले स्तरावरून आदेश व्हावेत म्हणून आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मंत्री उदय सामंत यांना विनंती केली.

Adv