एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाल्याने मंत्रिमंडळ विस्तार आधीच महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याचा डबल धमाका दिसून आला
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले दरेगावचे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले अजित पवार यांचे गाव कोरेगाव तालुक्यातील नांदवळ हे होय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तार आधीच मंत्रिमंडळावर सातारा जिल्ह्याचेच वर्चस्व दिसून येत या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांकडे आता महत्त्वाची खाती मिळणार असून जिल्ह्याचा विकास कोणत्या गतीने होतोय याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
सातारा जिल्ह्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाल्याने सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून मंत्रिमंडळ विस्तारात आणखी कोणाचा समावेश होते याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे






