किल्ले प्रतापगड प्राधिकरण समितीच्या शासकीय सदस्य पदी काका धुमाळ, चंद्रकांत पाटील पंकज चव्हाण

478
Adv

खासदार छ उदयनराजे भोसले यांची प्रतापगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी यापूर्वीच निवड करण्यात आली आहे . प्रतापगड प्राधिकरण समितीच्या सदस्य पदी उदयनराजे समर्थक काका धुमाळ, चंद्रकांत पाटील आणि पंकज चव्हाण यांची निवड करण्यात आल्याची माहिती जलमंदिर येथील संपर्क सूत्रांनी दिली आहे या निवडीबद्दल उदयनराजे समर्थकांमध्ये जल्लोष व्यक्त होत आहे

राज्य शासनाने महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे संवर्धन आणि विकसन या दृष्टीने धोरणात्मक पावले उचलली आहेत .छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा वारसदार असलेल्या किल्ले प्रतापगड च्या विकासासाठी नवीन प्राधिकरण गठीत करण्यात आले आहे या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची राज्यशासनाने यापूर्वी निवड केली असून उदयनराजे भोसले यांचे किल्ले प्रतापगडच्या विकासासाठी काम सुरू झाले आहे .

शुक्रवारी साताऱ्यात ऐतिहासिक शिवकालीन वाघ नखांचे अनावरण व छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमांमध्ये किल्ले प्रतापगडाच्या विकासासाठी राज्य शासनाने अंदाजपत्रकात दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमादरम्यान दिली .दोन टप्प्यांमध्ये ही विकासनाची कामे हाती घेतली जाणार आहेत

तत्पूर्वी प्रतापगड प्राधिकरणाच्या समितीचा विस्तार करण्यात आला असून समिती सदस्य पदी खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक काका धुमाळ ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील व भाजपच्या सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे याबाबतचे अधिकृत पत्र खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीने संबंधित सदस्यांना देण्यात आले या तीन सदस्यांच्या निवडीचे उदयनराजे समर्थकांनी स्वागत केले आहे

Adv