छ संभाजीराजे जयंती शासन स्तरावर साजरी होणार शंभू प्रेमींच्या लढ्याला यश

326
Adv

छत्रपती संभाजी महाराज यांची 14 मे रोजी असणारे जयंती शासन स्तरावरून साजरी केली जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती दिनविशेष यादी मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा समावेश करण्यात आला आहे शिंदे गट आणि भाजप युती सरकारच्या या निर्णयाचे शंभू प्रेमी मधून स्वागत होत आहे

धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर गडावर झाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजी महाराज यांनी आपल्या नव वर्षाच्या कारकिर्दी मध्ये तितक्याच ताकदीने आणि धोरणात्मक पद्धतीने आपले योगदान दिले औरंगजेबाच्या छावणीमध्ये धर्मरक्षणासाठी त्यांनी अत्यंत तेजस्वीपणे स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्यामुळे धर्मवीर संभाजी यांची 14 मे रोजी साजरी होणारी जयंती ही शासन स्तरावरून साजरी केली जावी असा जनरेटा बऱ्याच काळापासून सुरू होता

शंभू प्रेमी समर्थकांनी सुद्धा ही मागणी चांगलीच लावून धरली होती लोकांच्या जनभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने थोर व्यक्ती पुरुषांच्या जयंती यादी मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा समावेश केला आहे यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुधा तातडीने सुरू करण्यात आली आहे राज्य शासनाच्या या निर्णयाचे खासदार छ उदयनराजे भोसले यांनी सुद्धा स्वागत केले असून या ऐतिहासिक निर्णयाबद्दल राज्य शासनाला धन्यवाद दिले आहेत

Adv