
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मात्र महाराष्ट्र राज्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या आयत्या स्टेजवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्षांसह भारतीय जनता पार्टी युवा सेलचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे पदाधिकारी,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, संपर्कप्रमुख व पदाधिकारी यांची चमकोरीगिरी दिसून आली
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी मान्यवरांच्या यादीमध्ये राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित जिल्ह्याचे खासदार आमदार व प्रशासनातील अधिकाऱ्यांची नावे नावे शासकीय पत्रिकेत असताना या राज्य सरकारच्या आयत्या स्टेजवर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांच्या जिल्हाध्यक्ष विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नियमानुसार आपली नावे पत्रिकेत नसताना सुद्धा स्टेजवर बसून चमकोगिरी केली याची चर्चा या कार्यक्रमात दबक्या आवाजात ऐकू येत होती
एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असेल तर संबंधित जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी चमकोगिरी व मंत्री महोदयांच्या मागे लुडबुड केली तर काही आश्चर्य वाटायला नको मात्र राज्य सरकारच्या कार्यक्रमाच्या आयत्या स्टेजवर ही चमकोगिरी केल्याने विरोधकांना आयते कोलीत दिले आहे





