कृषीप्रधान भारत देशाच्या 23-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातुन शेवटच्या व्यक्तीचा, शेतकरी,अदिवासी, महिला, युवा, मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांचा विचार करण्यात आला आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून प्रारंभ झालेल्या देशाच्या अमृतकाळातील सर्वजनहिताय असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रीया खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
विकसित भारताकडे प्रवासाचा रोडपॅप दर्शविणारा हा अर्थसंकल्प असून, याला ग्राथ बजेट,ग्रीन बजेट,इन्फ्रा बजेट, मध्यम वर्गीयांचे बजेट शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार करणरे बजेट असे कोणत्याही नावाने संबोधू शकता.सर्वच वर्गांना आणि घटकांना दिलासा देणारा, त्यांना मदत करणारा हा अर्थ संकल्प आहे.सुमारे 10 लाख कोटी पायाभूतसुविधांवर गुंतवणुकी तून मोठया प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे.
याशिवाय राज्यांना 50 वर्षासाठी व्याजमुक्त कर्ज देण्यातून राज्यांना सुध्दा पायाभुत सुविधांमध्ये गती देता येणार आहे. 27कोटी लोकांना ईपीएफओच्या कक्षेत आणण्यामुळे सामाजिक सुरक्षेचाही मोठा विचार करण्यात आला आहे.
दृष्टीने दूरदर्शीपणाने घेतलेला निर्णय आहे.नोकरदारांच्या 7 लाख रुपये पर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही हा फार मोठा दिलासा नोकरवर्गासाठी दिला आहे. 9 लाखापर्यत उत्पन्न असणा-या नोकरदारांना केवळ 45 हजार आयकर भरावा लागणार आहे. तर 15 लाखा पर्यंत उत्पन्न असणा-यांना केवळ दिड लाख रुपये आयकर आकारला जाणार आहे. काही वस्तु व सेवावरील, वस्तु आणि सेवा करातील दरात
कपात करण्यात आली आहे. ही फार मोठी उपलब्धी आहे.
एकंदरीत सशक्त भारत आणि समृध्द भारतीय निर्माण करणारा हा अर्थसंकल्पन आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आम्ही देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री ना. अमितभाई शहा, केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.डॉ. भागवत कराड, यांचे मनापासून आभार मानतो असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रतिक्रीयत शेवटी नमुद केले आहे.