सातारा जिल्हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या
वर्धन अग्रो प्रोसिसींग लि. या कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेला अखेर सुरूवात झाली असून शेतकरी, वाहतूकदार शेअर होल्डर आणि कामगारांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे
मंगळवार दि १२ ऑगस्ट २०२५ रोजी दै. लोकसत्ता पुणे आवृत्ती मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर निवेदनात वर्धन ऑग्रो प्रोसेसिंग लि त्रिमली यांच्याकडे वीस कोटी पंचाहत्तर लाख तेरा हजार आठशे एक्कावन्न रुपये थकीत असून ३१ जुलै २०२३ पासूनचे व्याज देखील थकले आहे.त्यामुळे युनियन बँक ऑफ इंडिया,शाखा पुणे यांनी कारखान्याचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाईन पद्धतीने होणारी लिलाव प्रक्रिया २६ ऑगस्ट २०२५
रोजी दुपारी १२ ते ५ या वेळेत पार पडणार आहे या लिलावात धैर्यशील ज्ञानदेव कदम,विक्रमशीलज्ञानदेव कदम, सत्वशील ज्ञानदेव कदम, जनाबाई गणपती येवले,दादासो मानसिंग भोसले यांची वैयक्तिक मालमत्ता, पुसेसावळी,
त्रिमली, गोरेगाव येथील जमीन तसेच वर्धन ऑग्रोचा कारखाना,त्याची जमीन आणि सर्वच मालमत्ता समाविष्ट आहे. या घडामोडीमुळे परिसरातील ऊस उत्पादक वाहतूकदार शेअरहोल्डर आणि कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.






