खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचे दैवतच माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असून माझा रोख हा सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे होता भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची सातारानामाला माहिती
माढा मतदार संघात कोरोना काळात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम उत्कृष्ट असल्याने मी असे बोललो मात्र माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला असून सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे काम करोना काळात न दिसल्याने मी ते वक्तव्य केले असल्याचा खुलासा भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सातारा नामाशी बोलताना सांगितले
येणाऱ्या काळात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांच्या आदेशानेच पक्षवाढीसाठी निर्णय घेणार असून फलटण येथे झालेल्या मेळाव्यात सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे माझा रोख होता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे नहवे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असुन सातारा लोकसभा मतदार संघात आम्ही खासदार श्रीमंत छ उदयनराजे भोसले यांचा शब्द अंतिम मानणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी सांगितले






