
युवाशक्ती फाउंडेशन च्या वतीने सातारा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महागणपती 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये सुंदर गणेश मूर्ती, सुंदर देखावा तसेच महागणपती 2024 अंतर्गत सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या सर्वोत्कृष्ट मंडळांचा सत्कार करून त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे
ऑनलाईन फ्रॉम
👇🏻
https://forms.gle/YMwNwcJfQ7Movb7w5
सुंदर गणेश मूर्तीसाठी पहिले बक्षीस 11001,दुसरे बक्षीस 7001, तिसरे बक्षीस 5001, तर सुंदर देखाव्यासाठी पहिले बक्षीस अकरा हजार एक द्वितीय बक्षीस 7001 तृतीय बक्षीस5001 असणार आहे सहा फुटावरील मूर्तीसाठी पहिले बक्षीस 11001 दुसरे बक्षीस 7001 व तिसरे बक्षीस पाच हजार एक असणार आहे तसेच बक्षीसाबरोबर सन्मान चिन्ह दिले जाणार आहे
महागणपती 2024 या उपक्रमांतर्गत सामाजिक उपक्रम धडाडीने राबवणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी प्रथम बक्षीस पंधरा हजार एक, द्वितीय बक्षीस 11001 व तृतीय बक्षीस 7001 व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून किमान दोन वर्ष हे उपक्रम राबवले गेले पाहिजे .सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार आहे गणेशोत्सव मंडळांना एकाच कोणत्याही स्पर्धेत भाग घेता येणार आहे निवड समितीच्या निर्णयावर कोणी आक्षेप घेता कामा नये .तसेच ज्या मंडळांचे गुण समान होतील त्यावेळी ज्या गणेशोत्सव मंडळाला जास्त वर्ष झाली आहेत ज्यांच्या सामाजिक उपक्रमांची संख्या मोठी आहे अशा मंडळांचा प्राधान्याने विचार केला जाणार असल्याचे महागणपती स्पर्धा 2019 चे संयोजक व युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी कळविले आहे