गांगुलीची खुर्चीही जाणार? अध्यक्षपदासाठी दोघांची नावं चर्चेत

299
Adv

भारतीय क्रिकेट संघात बदल होताना दिसतं आहे. आधी प्रशिक्षक नंतर कर्णधार असे एक एक बदल होत आहेत. नवे चेहरे समोर येत आहेत. हे सर्व घडत आहे, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलच्या काळात. मात्र त्यांचेचपद गेले तर..? बीसीसीआयमध्ये लवकरच मोठे बदल होणार आहे. बीसीसीआयची 2 मार्चला एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याचं भवितव्य ठरणार आहे. सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ समाप्त होत आला आहे. त्यामुळे या दोघांच्या जागी नवे चेहरे पाहायला मिळू शकतात.

या दोघांची नावं चर्चेत?
बीसीसीआय अध्यक्षपदासाठी विद्यमान सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या नावाची चर्चा आहे. राजीव शुक्ला (Rajeev Shukla) हे आयपीएलचे चेयरमन राहिले आहेत. त्यामुळे या दौघांपैकी कोणा एकाची वर्णी लागणार की बीसीसीआय पुन्हा गांगुलीला कार्यकाळ वाढवून देणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

टीम इंडियाचा ‘दादा’
– गांगुली हा टीम इंडियाचा यशस्वी कर्णधारांपैकी एक
– निवृत्तीनंतर गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष
– त्यानंतर गांगुलीची बीसीसीआय अध्यक्षपदी वर्णी
– गांगुलीच्या कॅप्टन्सीत खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना महत्त्वाची जबाबदारी सोपविली

Adv