विश्वशांतीसाठीचा शिवपंचायतन महायज्ञ सोहळ्याला अलोट गर्दी

234
Adv

सातारा- गेल्या चार वर्षापासून होणारी अतिवृष्टी, वादळे, भूसख्खलन, महापूर अशा नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारखी महामारी, युद्धे अशी संकटे येत आहेत. सर्वांनाच याचा फटका बसत असल्याने सर्व प्रकारच्या संकटांचे निवारण व्हावे, सर्वांच्या जीवनात शांतता, सुख, समृद्धी यावी आणि विश्वशांतीच्या उद्देशाने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले  यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित महारुद्र शिवमहापंचायतन महायज्ञाला सातारकरांनी अलोट गर्दी केली.  सकाळीच मुहूर्तावर महायज्ञास प्रारंभ झाला. आ. शिवेंद्रसिंहराजे, सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या उपस्थितीत वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्यासह शेकडो ब्रम्हवृन्दाच्या मंत्रघोषाने अवघी सातारा नगरी प्रफुल्लित होवून नवचैतन्य आल्याचे दिसत होते.  

 
सर्वप्रकारची संकटे दुर व्हावीत आणि जगात सुख, समृद्धी, शांतता नांदावी यासाठी आ.शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतर अनाठायी खर्च टाळून महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी आ.  शिवेंद्रसिंहराजे व सौ. वेदांतिकराजे यांच्या हस्ते महायज्ञात समिधा अर्पण करुन वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोच्चारात यज्ञास प्रांरभ झाला. यज्ञाच्या ठिकाणी आर्वजून सातारा शहरातील गटतट विसरुन अनेकांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे कार्यकर्ते तर आर्वजून हजर राहिले होते. महायज्ञामुळे सकाळपासून गांधी मैदानाच्या परिसरात प्रसन्न आणि धार्मिक वातावरण बनले होते. 

गांधी मैदानावर शिवपंचायत महायज्ञाला येणाऱ्या सातारकरांसाठी बसण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती. यज्ञाच्या ठिकाणी आतमध्ये दर्शनकरता प्रवेश दिला जात होता. दर्शन घेवून बाहेर येणाऱ्या नागरिकांना प्रसाद दिला जात होता. संपूर्ण सोहळ्याचे नेटके संयोजन करण्यात आले होते. यज्ञास आहुती देण्याचा मान सर्वसामान्य सातारकरांना देण्यात आला होता. महायज्ञाला बसवण्यात आलेल्या जोडप्यांमध्ये सर्वसामान्य साताकर  मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यथे कोणीही कार्यकर्ता दिसत नव्हता.जे सातारा शहरात सर्वसामान्य आहेत, अशांनाच यज्ञाचा मान होता. महायज्ञाला भाविकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत झालेल्या या महायज्ञामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि प्रसन्न वाटत होते. 

Adv