कुरणेश्वर म़ॉर्निंग वॉक ग्रुपच्यावतीने वृक्षारोपण

259
Adv

सातारा, दि. – पुण्यशील राजमाता श्री.छ. सुमित्राराजे भोसले यांची पुण्यतिथी आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कुरणेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुपच्यावतीने किल्ले अंजिक्यतारा परिसरात शाहुनगरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्री.छ. वृषालीराजे भोसले यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मित करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्याचा उद्देश असतो. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कुरणेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुप कार्यरत आहे. पुण्यशील राजमाता श्री.छ. सुमित्राराजे भोसले यांची पुण्यतिथी आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून किल्ले अंजिक्यतारा परिसरात कुरणेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुपच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाहुनगरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्री.छ. वृषालीराजे भोसले उपस्थित होत्या. त्यांच्याहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी पुण्यशील राजमाता श्री.छ. सुमित्राराजे भोसले यांनी केलेले कार्य आणि आठवणी सांगितल्या. त्याचप्रमाणे केवळ एक दिवस पर्यावरण दिन साजरा न करता प्रत्येक व्यक्तीने आपआपल्या परीने पर्यावरण जपण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. यावेळी डॉ. सतीश भोसले, अनिल कांबळे, शिवाजी क्षीरसागर, प्रवीण कदम, कल्याण राक्षे, उमेश खंडूझोडे, गणेश दुबळे, बागडे आणि मान्यवर उपस्थित होते. आभार अजित भिलारे यांनी मानले.

Adv