
बांधकाम मंत्री यांच्या निवास स्थानापासून हाकेच्या अंतरावर राजवाडा चौपाटी,गोलबाग,मोती चौक,मारवाडी चौक,खन आळी ,देवी चौक कमानी हौद या मार्गावर सायंकाळी सात नंतर दोन्ही बाजूला गाडी खुशाल पार्क करून वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे चित्र दिसून येते
वाहतूक विभागाचे अभिजीत यादव दोन दिवस कारवाई करण्याची प्रक्रिया राबवतात त्यानंतर पुन्हा बे एके बे अशीच अवस्था मुख्य राजपथावरील रस्त्यावर पाहायला मिळते काही ठिकाणी अभिजीत यादव यांचे काम चांगले आहे मात्र वाहतूक कोंडी सुटत नसेल तर खाकीचा धाक या अशा बेधडकपणे रस्त्यावर गाडी पार्क करणाऱ्या लोकांवर नाही असे दिसते
कॅबिनेटमंत्री यांच्या निवासस्थानंपासून हाकेच्या अंतरावरच वाहतुकीची कोंडी होत असून सातारा शहर वाहतूक विभागाचे याकडे स्पष्ट दुर्लक्ष असल्याचे चित्र रोज सायंकाळी पाहायला मिळते राजवाडा चौपाटी ते देवी चौक या राजपथावर सायंकाळी सात ते नऊ वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे वाहतूक विभाग दोन दिवस कारवाई करण्याची प्रक्रिया राबवते तिसऱ्या दिवशी पुन्हा वाहतूक कोंडी ही ठरलेली असून यावर नक्की तोडगा काढणार तरी कोण असा प्रश्न वाहन चालकांना पडतो
मुख्य बाजारपेठेसमोरच वाहतूक कोंडी होत असेल तर या व्यापारी वर्गाचे पार्किंग गेले कुठे म वाहतूक कोंडी व्यापारी वर्गाच्या दुकानदारांमुळे होते की काय असाही प्रश्न निर्माण होत असून वाहतूक विभागाने लवकरात लवकर तोडगा काढून करावी असे अपेक्षा साताऱ्यातील वाहन चालक करत आहेत