सातारकराना या वर्षी निवडणुकीच्या काळात नवीन चेहरे पाहण्यास संधी होती मात्र तसे न जाहल्याने पुन्हा तेच तेच उमेदवार रिंगणात आल्याने मतदार राजाची अंतर्गत नाराजी पाहायला मिळते
कराड नगरपालिकेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अथवा नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्तक्षेप नसतो मात्र उमेदवारीचे एबी फॉर्म देताना आमदार अतुल भोसले यांनी एका गटावर सपशेल अन्याय केला असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आमदार अतुल भोसले यांनी कोणाच्या राज मान्यतेने सातारा पालिकेत हस्तक्षेप केला अशी चर्चा रंगत आहे
साताऱ्यातील काही युवा नेतृत्वांना भाजप ने संधी दिली नाही तसेच येथील स्थानिक नेतृत्वानेही संधी दिली नसल्याने दोन्ही नेतृत्वावर युवा नेतृत्वाची नाराजी दिसत असून आपला मोर्चा राजकारणाकडे न वाळवता दुसरीकडे वळवावा अशीच अपेक्षा आता येथीलयुवा वर्ग करत आहे
उमेदवारीत न बदल केल्यामुळे विकासाची अपेक्षा कोणाकडे करणार पत्नी नंतर पती अशाच उमेदवारी दिल्या गेल्याने मतदानाची ही टक्केवारी साताऱ्यात कमी होऊ शकते अशी चर्चाही रंगत आहे







