Saturday, April 11, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City सुधाकर यादव यांच्या नेतृत्वात तामजाई नगरात विकासकामांचा वेग..

सुधाकर यादव यांच्या नेतृत्वात तामजाई नगरात विकासकामांचा वेग..

64
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

तामजाई नगर परिसरात प्रलंबित पाणी व ड्रेनेज समस्यांवर अखेर ठोस कामाला सुरुवात झाली असून नगरसेवक सुधाकर यादव (आबा) यांच्या पुढाकारातून पाईपलाईन व चेंबर उभारणीची कामे वेगाने सुरू आहेत.

काळभोर घर ते निष्ठ रेसिडेन्सी तसेच गणेश कॉलनीतील रासकर घर ते मोरे घर या भागांमध्ये पाईपलाईन व चेंबरचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यात आले असून, या कामाची सुरुवात नगरसेवक यादव यांनी स्वतः उपस्थित राहून केली.
विशेष म्हणजे, ज्या कामांवर अनेक दिवस फक्त चर्चा होत होती, ती कामे आता प्रत्यक्षात मार्गी लागत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, काहीजण केवळ फोटोसेशन व प्रसिद्धीसाठी कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा असून, प्रत्यक्ष कामात सहभाग नसतानाही श्रेय लाटण्याच्या प्रकारांवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “काम करणारा आणि नाव लावणारा यात फरक असतो,” असा सूर नागरिकांमध्ये उमटताना दिसत आहे. याबाबत बोलताना नगरसेवक सुधाकर यादव म्हणाले,नागरिकांच्या समस्या सोडवणे हेच आमचे कर्तव्य आहे. दिखावा किंवा भुलथापा देण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करून दाखवणे महत्त्वाचे आहे.”

Adv