साताऱ्यात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाने अनेक जण भारावून गेले आहेत आज छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर निवासस्थानी पालखी चे आगमन झाल्यानंतर स्वागत करण्यात आले. या वेळेला श्रीमंत छत्रपती खा उदयनराजे भोसले यांनी श्री चे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील दुष्काळ नाहीसा व्हावा तसेच सर्वांना सुख समाधान लाभावे. अशी सदिच्छा देऊन सर्व भाविकांना व मित्रपरिवार यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
शके १९४५ फाल्गुन अमावस्या सोमवार दिनांक ८ एप्रिल ते बुधवार दिनांक १० एप्रिल अखेर श्री चा रथातून भव्य दिव्य शुभयात्रा काढण्यात आली. आज रविवार दिनांक ७ एप्रिल रोजी शुभ यात्रा जल मंदिरात आली.श्री छ उदयनराजे भोसले यांनी श्री चे दर्शन घेतले. बोगदा परिसरात ही रथयात्रा गेले १९ वर्ष भक्ती भावाने निघत आहे.
श्री. अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, बोरणे -ठोसेघर सातारा येथून दादा महाराज फाउंडेशन, सातारा- पुणे स्वामीभक्त परिवार बघतो व सदस्य उपस्थित होते. श्री परमपूज्य यशवंत बाबा कुरोलीकर यांचे परमभक्त परमपूज्य श्री पालकर भाऊ यांच्या कृपाशीर्वादाने ही रथयात्रा निघाली होती. यावेळी पहाटे साडेपाच वाजता श्री ची काकड आरती, श्री चा अभिषेक महापूजा व आरती, श्री स्वामीयाग व नाम यज्ञ चंद्रकांत कुलकर्णी काकांनी केले.श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पोथी सामुदायिक पारायण करण्यात आले.तसेच आरती व प्रसाद, भजन सेवा सामूहिक नामस्मरण व जप तसेच भजन सेवा ,भावगीत- भक्तीगीत कार्यक्रम झाले.
कार्यक्रमाला संपूर्ण धार्मिक अध्ययन लाभल्यामुळे खऱ्या अर्थाने उत्सव काळातील सर्व कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते .विशेष म्हणजे या सर्व स्वामीभक्त परिवार, स्वामी सेवक हितच,श्री स्वामी समर्थ सेवा,हवेली श्री स्वामी समर्थ मंडळ, केदारनाथ वाडी,श्री स्वामी समर्थ मंदिर,खटाव,श्री स्वामी समर्थ महाराज पृथ्वी धाम वाघजाईवाडी, श्री यशवंत बाबा सेवा फाऊंडेशन व अनेक मान्यवरांनी यावेळी श्री चे दर्शन घेतले.
श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य श्री केदारनाथ महाराज सागरेश्वर यांच्या कृपेने तसेच परमपूज्य श्री सरूताई महाराज, मायणी व परमपूज्य श्री दादा महाराज बेलवडे हवेली यांच्या कृपाशीर्वादाने हे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज उदयनराजे भोसले यांच्यासमवेत श्री सुनील काटकर, श्री राजू गोडसे,श्री काका धुमाळ, श्री पंकज चव्हाण, श्री विनीत पाटील, श्री गणेश दीक्षित, श्री चंद्रकांत पाटील, आदी मान्यवरांनी श्रीचे दर्शन घेतले.