छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये सिंथेटिक ट्रॅक बनवण्यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश मोरे यांचा रहिमतपुर मध्ये विशेष सत्कार करण्यात आला शिवसेनेचे सातारा सांगली संपर्कप्रमुख प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी मोरे यांचा शाल व बुके देऊन विशेष सत्कार केला यावेळी हणमंत चवरे,हैबतबापू नलावडे, दत्तात्रय नलावडे, रमेश बोराटे उपशहरप्रमुख अभिजीत सपकाळ व गणेश अहिवळे उपस्थित होते
बानगुडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रहिमतपूर येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे यांनी सदिच्छा भेट घेत बानगुडे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मात्र शिवसेनेचे शहरप्रमुखांनी केलेल्या कामगिरीची दखल बानगुडे पाटील यांनी घेतली मोरे यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये सिंथेटिक ट्रॅक बनवण्यासाठी 11 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे या कामाची निविदा लवकरच सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून काढली जाणार आहे या कामाची दखल बानगुडे पाटील यांनी घेत मोरे यांना शाबासकी दिली व त्यांचा शाल आणि बुके देऊन सत्कार केला
निलेश मोरे यांनी एका पत्राच्या माध्यमातून सातत्याने सिंथेटिक ट्रॅक साठी नगर विकास आयुक्तांसह मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला यासंदर्भात आयोजित सहा बैठकांना निलेश मोरे यांनी सातत्याने सादरीकरण केले कोणत्याही सत्तेशिवाय निलेश मोरे यांनी आणलेला हा निधी आणि त्या संदर्भातले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी या पद्धतीने काम करावे असे कौतुकोद्गार बानगुडे पाटील यांनी काढले