सातारा जिह्याला ऐतिहासिक पंरपरा आहे. क्रांतिज्योती सावित्रीमाई याच जिह्यातील, महात्मा ज्योतिबा फुले याच जिह्यातील आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा या जिह्याला वारसा लाभलेला आहे. आजचा समाज घडविण्यामध्ये शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे. विलासपूर-गोळीबार मैदान परिसरातील शिक्षकांनी आपला माणूस म्हणून मला सुचना सांगाव्यात, खासदार उदयनराजेंच्या माध्यमातून विकास करणार आहे, अशी ग्वाही युवा नेते संग्राम बर्गे यांनी दिली.
विलासपूर येथील सभागृहात खासदार उदयनराजे मित्र समुह व संग्राम बर्गे मित्र परिवाराच्यावतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा आयोजित सत्कार सोहळयात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे प्रा.श्रीधर साळुंखे रघुनाथ मोटे, एकनाथ वाघ, व्ही. डी जाधव होते.
यावेळी बोलताना संग्राम बर्गे म्हणाले, शिक्षक नवी पिढी घडवतात. नव्या पिढीला प्रोत्साहन देतात. त्यामुळे आम्हाला तुम्हा शिक्षक मंडळींचा अभिमान आहे. तुमचे विचार, आचार आजच्या तरुण पिढीने आचरणात आणले पाहिजेत. माझ शिक्षण सगळे मोफत झाले. स्वामी विवेकनांद शिक्षण संस्थेत मी शिकलो. मला जी शिस्त माहिती आहे. ती शिस्त माझ्या शिक्षकांच्यामुळे मला मिळाली. शिक्षक समाजाला दिशा देण्याचे काम करतात. शिक्षका सन्मान करण्याचा मला मान मिळाला हे माझ भाग्य समजतो.
प्रा. श्रीधर साळुंखे म्हणाले, युवकांमध्ये नम्रपणा दिसला पाहिजे. तो नम्रपणा संग्राम बर्गे यांच्यामध्ये पहायला मिळतो. त्यांनी शिक्षकांचा सन्मान शिक्षक दिनी करण्याचा राबवलेला उपक्रम प्रेरणादायी आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यामध्ये राजकारणाचा वास येत असला तरीही हे समाजकारण आहे. समाजकारण हेच संग्राम बर्गे यांचे मुळ कार्य आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी सुरेश महाडिक, रमेश पवार, संजय सूर्यवंशी, विठ्ठल जाधव, आबा शिंदे, काका बागल, महेश चव्हाण, संजय कणसे, आशाताई जाधव, मंदा अष्टेकर व आजी-माजी शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.







