सातारा दि. – शाहुनगरीमध्ये छत्रपती घराण्याचा सामाजिक सेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी आणि आधुनिक काळाशी सुसंगत आणि लोकोपयोगी विविध उपक्रम राबवण्यासाठी समाजातील विविध घटकांनी एकत्रित येऊन शाहुनगरी फौंडेशनची स्थापना झाली आहे. या फौंडेशनच्यावतीने कर्तृत्वान महिलांसाठी महाराणी येसूबाई पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. पहिला पुरस्कार सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना जाहीर झाला असल्याची माहिती फौंडेशनच्या अध्यक्षा श्री.छ. वृषालीराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते ह्या यापूर्वी सातारा जिल्हयामध्ये कार्यरत होत्या त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न सोडवले. त्याचप्रमाणे सामान्य जनतेमध्ये पोलिसांबद्दल विश्वास आणि सौहादर्याचे वातावरण निर्माण केले. कोविड काळातही त्यांनी केवळ पोलिसांसाठी पहिले कोविड सेंटर सुरु करुन पोलिस बांधवांच्या आरोग्याची काळजी घेतली, त्यांचे प्राण वाचवण्याचे मोलाचे कार्य केले. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन शाहुनगरी फौंडेशनमार्फत देण्यात येणारा पहिला महाराणी येसूबाई पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. 1 मे रोजी शाहुकलामंदिर येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी ताराराणी फेम अभिनेत्री दिप्ती भागवत यांच्याहस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार असून यावेळी सातारचे माजी नगराध्यक्ष श्री.छ. शिवाजीराजे भोसले, ख्यातनाम वक्ते व प्रसिध्द लेखक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांची प्रमुख उपस्थिती असून विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार सोहळयास सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहनही श्री.छ.वृषालीराजे भोसले यांनी केले आहे.
Home Politics|Satara District Satara City शाहुनगरी फौंडेशनचा पहिला महाराणी येसूबाई पुरस्कार पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना जाहीर...