Friday, April 10, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City सातारा विकास आघाडीकडून त्रिशंकू भागाचा समत्वभावाने विकास

सातारा विकास आघाडीकडून त्रिशंकू भागाचा समत्वभावाने विकास

346
Adv

विकास ही एक अविरत संकल्पना आहे. समत्वभावाने अविरत विकास साधण्यासाठी सातारा विकास आघाडी समाजाप्रती कटीबध्द आहे. विकास साधताना सातारा विकास आघाडीने अपपरभाव विरहित विकास साधला आहे.त्यामुळेच इतक्या मोठया प्रमाणावर लोकहिताच्या विकास कामांचा शुभारंभ होत आहे असे उदगार सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले.सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातुन,सातारा विकास आघाडीने नव्याने समाविष्ट झालेल्या विलासपूर गोळीबार मैदान परिसरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले विविध ठिकाणी नागरीकांशी हितगुज करताना,बोलत होते.

सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे डि जी बनकर, विलासपूर परिसरातील संग्राम बर्गे,बुवा सुर्यवंशी, किरण नलवडे, यांचेसह विविध मान्यवर यावेळी प्रमुख उपस्थित होते.
लोकउपयोगी कामे आणि सेवा सुविधा नागरीकांना उपलब्ध करुन देणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्यच आहे. याच धोरणेतुन आम्ही नेहमीच कार्यरत राहीलो आहोत. तसेच विकास ही सातत्याने घडणारी क्रीया आहे. तथापि समतोल आणि समत्वभावाने विकास साधणे महत्वाचे आहे. त्याच दृष्टी कोनामधुन सातारा विकास आघाडीची आत्तापर्यंत वाटचाल राहीली आहे.अपपरभाव ठेवून केलेल्या विकासाला विकास म्हणता येणार नाही.सातारा विकास आघाडीने कधीही हा माझा, तो माझा असा भेदभाव न ठेवता, नागरीकांना केंद्रबिंदू
मानुन सेवा सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे असे स्पष्ट केले. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक मान्यवरांच्या हस्ते, रामराव पवार नगर, स्वराज्य नगर,नंदादिप सोसायटी, शिवप्रेमी कॉलनी, जगदाळे बाग,मोरे कॉलनी,सहजीवन सोसायटी, इंदिरा नगर,फॉरेस्ट कॉलनी,यशोदा नगर,आदी ठिकाणी रस्ते डांबरीकरण,आरसीसी.ड्रेनेज व्यवस्था,नाना-नानी पार्क आदी कामांच्या भुमीपूजनचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी राहुल पाटोळे, विलास उर्फ नाना शिंदे, आबा शिंदे, काका बागल, उदय मराठे, धनेश खुडे, विजय पवार, विठ्ठल जाधव,अमोल कदम, किरण बाबर, अमेय घाडगे,जेष्ठ नागरीक संघाचे
श्री.मोटे, श्री. नलवडे, श्री.वाघ, संजय चव्हाण, विक्रम पवार, राम मदाळे, गिरिष काकडे, अॅड.विकास पवार, महेश चव्हाण या कार्यकत्यांसह बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

Adv