
महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे राजकारणामध्ये अनुभवाने ज्येष्ठ आहेत मात्र त्यांनी वाई येथील सभेत वापरलेला गद्दार हा शब्द कशाच्या आधारे वापरला हे चुकीचे आहे या विविध योजना सर्वसामान्यांसाठी महायुतीने लागू केले आहेत त्या योजना यापूर्वी साठ वर्षे सत्ताधाऱ्यांना दिसल्या नाहीत का अशी जळजळीत टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली
येथील गांधी मैदानावर महायुतीचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारा निमित्त आयोजित सांगता सभेत ते बोलत होते यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, उपाध्यक्ष राहुल शिवनामे, विट्ठल बलशेटवार, अविनाश कदम, लोकसभा संयोजक सुनील काटकर, अमोल मोहिते, अशोक मोने एडवोकेट दत्ता बनकर काका धुमाळ जितेंद्र खानविलकर तसेच सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी याचे विविध सदस्य उपस्थित होते
उदयनराजे पुढे म्हणाले सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे .येथे अनेक चळवळी उदयाला आल्या आमदार शिवेंद्रसिंह राजे व मला राजघराण्याचा वारसा लाभला आहे आपण मतदारांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आम्ही दोघेही लोकप्रतिनिधी म्हणून आपली सेवा करण्यास बद्ध आहोत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे बोलण्यासारखं काहीच नाही महायुतीच्या कारभाराने त्यांना बोलण्यासाठी शब्दच ठेवला नाही विरोधकांचे ध्येय फक्त अफवा पसरवून सत्ता हस्तगत करणे इतकेच आहे त्या पलीकडे काही नाही शरद पवार यांनी वाई येथील सभेत गद्दारांना पाडा असे आवाहन केले होते हा शब्द त्यांनी कोणत्या आधारे वापरला ते चुकीचे आहे पवार हे राजकारणामध्ये जेष्ठ आहे त्यांना असे शब्द वापरणे शोभत नाही अशी टीका त्यांनी केली गेल्या साठ वर्षात ज्यांनी बोल थापा मारल्या त्यांना तुतारी मिळाली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाले ते आता हातात घेऊन उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी केलेली विकास कामे शोधत आहेत महायुतीला लागली कडकी म्हणून आणली बहीण लाडकी ही योजना हे काय बोलणं आहे का स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी असले उद्गार महाविकास आघाडीचे नेते काढत आहेत त्यांनी जो जाहीरनामा काढला आहे तो महायुतीने यादीच पूर्ण केलेला आहे
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे तसेच जावली हा इतिहास सांगितला जातो या दोन्ही मतदारसंघात त काम करताना माझ्यावर मोठी जबाबदारी आहे आज येथे लाडक्या बहिणी एकटे आले असल्या तरी घरातील चार मते घेऊन आले आहेत माझ्या विजयाच्या खऱ्या अर्थाने त्यात शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेले हे ठिकाण आहे त्याचबरोबर अभयसिंह राजे यांनी एक वारसा घालून दिला आहे तो जपण्याचे काम आम्ही सातत्याने करत असतो सातारा हा भाजपचा बालेकिल्ला बनवा आता सर्वांच्या माध्यमातून विजयाची घोडदौड सुरू आहे त्यामुळे येत्या पाच वर्षात विकासाची घौडदौड तुम्हाला दिसून येईल माझ्या दृष्टीने मंत्री पद महत्त्वाचे नाही मंत्रीपदापेक्षाही चांगली कामे केलेली आहेत भविष्यात मंत्री पद मिळाले तर अधिक चांगले काम करता येईल सातारकर हा केंद्रबिंदू म्हणून मी काम करणार आहे या पुढील काळात सतत मी आपल्या बरोबर असणार आहे सातारा आणि जावळी येथे पर्यटन वाढीसाठी नवीन महाबळेश्वर योजना प्रकल्प सुरू आहे बाहेरून आलेले पर्यटक साताऱ्यात आले पाहिजेत तसेच येथे व्यवसाय वृद्धी झाली पाहिजे आज माझ्या मागे तरुणाईची शक्ती दिसत आहे कारण त्यांना दिलेला वेळ आणि प्रेम याच्यामुळे आहे दिनांक 23 नोव्हेंबर रोजी अशी सभा होईल आणि ती विजयाच्या गुलालाची असेल ही खात्री आहे उदयनराजे आणि माझ्या संघर्ष होता पण देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बसून ते आम्ही वाद मिटवले आहेत राजे देवेंद्र यांची मोठी ताकद आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात विकास निधी येणार आहे बामनोली येथे पाच कोटीची तर नागठाणे ते वीस कोटींची वीज बिले माफ झाली त्यामुळे त्या वीस तारखेला महायुतीच्या उमेदवारांना विजयी करायचे आहे असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले
चौकट
आमच्या दोघांमधील संघर्ष संपला आहे अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देत साताऱ्याच्या विकासात आम्ही कोठेही कमी पडणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर गांधी मैदानावर टाळ्यांचा कडकडाट झाला आज पुष्पा चित्रपटातल्या डायलॉग प्रमाणे हम दोनो कभी झुके का नाही अन्यायाच्या पुढे झुकणार नाही त्यामुळे शिवण्याची राजांना आता मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा आम्हा दोघांना निवडून येऊन तुमची सेवा करायची आहे मागच्या वेळी दुसऱ्या क्रमांकाचे शिवेंद्रसि येणारी निवडून आले यामध्ये एक नंबरला अशोक चव्हाण शिवेंद्रसिंह राजे आणि तीन नंबरला अजित दादा हे निवडून आले पण यावेळी एक नंबरला ओन्ली शिवसेनेचे राजे निवडून आले पाहिजेत असे आवाहन उदयनराजे यांनी केले