राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून सातारा शहरातील विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावण्यासाठी भरीव निधी उपलब्ध केला आहे. आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सातारा शहराच्या विकासामध्ये विशेष लक्ष आहे. विकास ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे. आगामी काळात सातारा शहरातील सर्व प्रकारचे प्रश्न सोडवू. सातारा शहराचा गतिमान विकास हेच आमचे लक्ष असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे. ज्यांना सातारा शहराविषयी, सातारकरांविषयी काहीही देणेघेणे नाही अशा लोकांनी केवळ राजकीय विरोध म्हणून निवडणुकीत सहभाग घेतला आहे. आपण सर्वजण सातारकर आहोत आणि सातारकर म्हणून सातारा शहराचा सर्वांगीण विकास करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी, नवनवीन योजना राबवण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीने सर्वसमावेशक उमेदवार दिले असून त्यांना विक्रमी मतांनी निवडून देण्यासाठी सर्वांनी २ डिसेंबर रोजी मतदानाचा हक्क बजवावा. विजय आपलाच आहे, त्यासाठी सातारकर म्हणून आपण सर्वांनी आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारांना केले.







