आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्हीही राजे मनोमीलनासाठी अनकुल असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मात्र सातारा शहर व हद्दवाडीतून स्वतःच्या स्वार्थासाठी मिठाचा खडा कोण टाकतंय याची चर्चा सध्या साताऱ्यात रंगत आहे
लोकसभा विधानसभेला दोन्हीही राजेंचे मनोमिलन झाले त्यावेळेस स्पष्ट केले होते की इथून पुढच्या निवडणुका या एकत्रित लढवणार लोकसभा व विधानसभेला एकजुटीने काम केल्याने लोकसभेला विजय झाला तर विधानसभा निवडणुकीच्या वेळीउच्चांकी मतदान होऊन आमदार शिवेंद्रसिंहराजेंना महाराष्ट्रात दोन नंबरची मते मिळाली मात्र ही एकी कायम राहू नये अशी अवस्था काही महाभाग लोकांची झाली असून सोशल मीडिया असेल खाजगी चर्चा असेल किंवा बॅनर बाजीची केलेली छेडछाड असेल असे विकृत प्रकार घडत आहेत त्यामुळे मनोमिलनात खडा टाकतोय कोण याची चर्चा रंगत आहे
भाई,काका दादा,मामा,भैय्या तात्या, अध्यक्ष तथाकथित स्वयंघोषित गल्लीबोळातील नेते हेच मनोमिलनाच्या खड्याला कारणीभूत ठरू नये असाही एक वर्ग दोन्ही आघाडीकडे असून एका आघाडीच्या विरोधात मुद्दाम खोडसाळपणा करून बदनामी करणारा मजकूर सोशल मीडियावर काही तथाकथित भाईचे कार्यकर्ते व्हायरल करत असून अशा कार्यकर्त्यांना त्या भाईने आवरावे अशीच चर्चा त्या आघाडीत रंगत आहे त्यामुळे मिठाचा खडा आपल्याकडून पडणार नाही याची जबाबदारी घेणाऱ्या कार्यकर्त्यांची सध्या गरज असल्याचे दिसून येते







