सातारा शहरात पालिके जवळील झाडावर कचऱ्याच्या पिशव्यांचे अफलातून झाड

293
Adv


नेहमी एखाद्या फळ झाडाला भरपूर प्रमाणात फळे लागली की ते झाड या फळांनी लगडून जाते. मात्र ..अशी ही सातार्‍याची तर्‍हा ,,या म्हणीला साजेसे असे वर्तन सध्या सातारा शहरात नागरिकांकडून पाहायला मिळत आहे. सातारा शहरातील शाहू चौकातील हाकेच्या अंतरावर असणारा नगरपालिका कार्यालया नजीकच्या रस्त्यावर नको असलेला कचरा ्पलास्टिक पिशवीत बांधून या पिशव्या या काटेरी झाडावर टाकण्यात आल्यामुळे शहराच्या मुख्य रस्त्याचे विद्रुपीकरण पाहायला मिळत आहे त्यामुळे आता असा प्रकार यापुढे तरी होऊ नये तसेच पालिकेच्या संबंधित आरोग्य विभागाने हे तातडीने हलवावे व येथून ये-जा करणार्‍या नागरिकांना असे दृश्य पाहायला मिळू नये अशीच अपेक्षा केली जात आहे .

Adv