राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून सातारा शहरातील 11 वेगवेगळ्या विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती खासदार छ उदयनराजे भोसले यांनी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.विशेष रस्ता अनुदानातून दोन कोटी 88 लाख रुपये तर वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून दोन कोटी बारा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे
पत्रकात पुढे नमूद आहे की वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून एक कोटी रुपयांची स्वतंत्र अभ्यासिका साताऱ्यात निर्माण करण्यात येणार आहे .याचा फायदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांना होणार आहे . सातारा नगर सातारा नगर परिषदेत हद्दीमध्ये युवक माहिती केंद्र अभ्यासिका बांधकाम व फर्निचर एक कोटी सातारा नगरपरिषद शाळांसाठी विविध सोयी सुविधा 40 लाख रुपये, गोडोली येथील विद्यानगर एसटी कॉलनी झुंजार कॉलनी व्यंकटेश हाउसिंग सोसायटी येथे ओपन स्पेस डेव्हलप करणे अंतर्गत रस्ते डांबरीकरण 45 लाख रुपये, रेणुका मंदिर परिसर माची पेठ जानकर घर संकल्प आपारमेंट शनिवार पेठअत्तारवाडा ते गुजर घर येथील रस्ते डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण 45 लाख रुपये, स्वच्छंद दत्त मंदिर ते फुटकातलाव विजय मंदिर ते कमानी हाऊस भोईगल्ली अंतर्गत रस्ते डांबरीकरण काँक्रिटीकरण 42लाख पंचपाळी हाऊस यादोगोपाळ पेठ गोल मारुती परिसर इत्यादी ठिकाणी अंतर्गत रस्ते डांबरीकरण काँक्रिटीकरण 32 लाख रुपये,
चिमणपुरा पेठ येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण नऊ लाख रुपये निळकंठ पवार ते राजू नलावडे घर, दादा थोरात घर येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे चाळीस लाख रुपये,श्री वास्तू बिल्डिंग ते शेख घर येथे रस्ता कॉंक्रिट करणे जोरे घर ते कोळेकर घर येथे संरक्षक भिंत व जंगीवाडा येथील अंगणवाडी बांधकाम दस्तगीर पेठ येथे शौचालय बांधकाम 50 लाख, सातारा नगरपरिषद हद्दीत महानुभाव मठ का तवडे वस्ती येथे ड्रेनेजव्यवस्था संरक्षक भिंत पाण्याची टाकी 52 लाख, अशी कामे या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत करण्यात येणार आहेत
सातारा शहरातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मॉडेल स्कूल तयार केले जाणार असून त्याकरता चाळीस लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत याबाबतचा निधी प्रशासकीय मान्यता नंतर लवकरच प्राप्त होणार असल्याचे खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी कळवले आहे







