सातारा शहर अतिक्रमण मुक्त करा: भारतीय जनता पार्टीची मागणी

473
Adv

काही दिवसांपूर्वी सातारा शहरातील मुख्य भाग असलेल्या राजवाड्यासमोरची अतिक्रमणे काढल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय मुख्याधिकारी आणि सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले , तसेच वाहतुकीला अडथळे आणणारी अतिक्रमणे काढून सातारा शहर अतिक्रमण मुक्त करावे अशी आग्रही मागणी सातारा नगरपालिका उपमुख्याधिकारी श्री दामले यांच्याकडे करण्यात आली

कोणत्यातरी कारणासाठी का होईना पण ऐतिहासिक राजवाड्या समोरील अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखवल्याबद्दल सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री अभिजीत बापट आणि सातारा नगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले

सातारा येथील जुन्या राजवाड्यात भरणाऱ्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कित्येक महान विभूतींचे शिक्षण झाले आहे , गेली अनेक वर्षे या राजवाड्या समोर अतिक्रमण करण्यात आले होते त्यामुळे एका छोट्याशा बोळातून या शाळेत जावे लागत होते, नगरपालिकेचा शिक्षण विभाग हा सुद्धा काही काळ या ठिकाणी अस्तित्वात होता

राजवाडा परिसर हा सातारा शहरातील सगळ्यात महत्त्वाचं परिसर असूनही या अतिक्रमणांकडे कुणाचेही लक्ष गेले नव्हते किंवा याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्यात येत होते, पण आता आपण ते अतिक्रमण काढून सातारकरांसाठी राजवाडा दर्शन खुले केले आहे , त्या ठिकाणी, ऐतिहासिक सजावट करावी , सेल्फी पॉईंट करावेत , त्याच प्रमाणे काढलेली अतिक्रमणे पुन्हा होऊ नयेत याची पूर्ण खबरदारी घ्यावी , आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण होते तो भाग ज्यांच्याकडे आहे त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना इथून पुढे होणाऱ्या अतिक्रमणासाठी जबाबदार धरण्यात यावे, याचबरोबर सातारा शहरातील वाहतुकीला अडथळे येतील असे सर्व अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपालिका अतिक्रमण विभागा मार्फत सुरू करावी आणि अतिक्रमणे मुक्त सातारा शहर करून दाखवावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आले

यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे , जिल्हा संवादक प्रवीण शहाणे, आर्थिक प्रकोष्ट जिल्हाध्यक्ष गौरव कासट, सातारा विधानसभा विस्तारक अविनाश खर्शीकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे आणि पदाधिकारी उपस्थित होते

Adv