राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील नवनगरपालिका आणि एक नगरपंचायतीच्या प्रभाग आरक्षणाची सोडत बुधवार दिनांक आठ रोजी काढली जाणार आहे .अनेक भावी नगरसेवकांची भवितव्य या सोडतीवर अवलंबून असल्याने कोणाची लॉटरी लागणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे .
जिल्ह्यातील सातारा कराड फलटण वाई रहिमतपूर म्हसवड महाबळेश्वर पाचगणी व मलकापूर या नवनगरपालिका आणि मेंढ्या नगरपंचायतीच्या सदस्य पदासाठी ही सोडत प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे संबंधित पालिकांनी याबाबतचे नोटीस जाहीर केल्या असून बुधवारी सकाळी 11 वाजता ज्या त्या पालिका कार्यक्षेत्रात ही प्रक्रिया पार पडेल .
जिल्ह्यात एकमेव अ वर्ग दर्जा असलेल्या सातारा पालिकेच्या आरक्षण सोडत इकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे येथील शाहू कला मंदिरामध्ये ही सोडत काढली जाणार आहे या सोडतीमध्ये अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित केले जाईल .आरक्षण सोडत काढणे ती प्रसिद्ध करणे आणि त्याच्या हरकती व सूचना मागवण्यासाठी मंगळवार दिनांक 14 दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे हरकतदार आपल्या हरकती व सूचना मुख्याधिकारी किंवा प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयाकडे सादर करू शकतात या सोडतीवर बऱ्याच राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत .
सातारा 25 प्रभाग 50 नगरसेवक शाहू कला मंदिर
वाई प्रभाग 11 नगरसेवक 23 पालिका सभागृह
मलकापूर 11 प्रभाग नगरसेवक 22 पालिका बहुउद्देशीय सभागृह
कराड 15 प्रभाग नगरसेवक 31 यशवंतराव चव्हाण स्मृती सदन
फलटण प्रभाग 12 27 नगरसेवक इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन
पाचगणी प्रभाग 10 नगरसेवक 20 छत्रपती शिवाजी महाराज सभागृह
महाबळेश्वर प्रभाग 10 नगरसेवक 20 खादी ग्रामोद्योग सभागृह
रहिमतपूर प्रभाग 10 नगरसेवक वीस वीरशैव लिंगायत समाज मठ
प्रभाग 10 नगरसेवक 20 पालिका सभागृह
मेढा नगरपंचायत प्रभाग 17 नगरसेवक 17 पंचायत समिती सभागृह