सातारकारांना हवा विकासाची दूरदृष्टी ठेवणारा नगराध्यक्ष

455
Adv

सातारा पालिकेच्या नगराध्यक्ष पदाला एक आगळावेगळा दर्जा असून मराठ्यांची राजधानी म्हणून सातारा शहरला ओळखले जाते त्यात साताऱ्यात आता नगराध्यक्ष पदासाठी अनेक नावे चर्चेत येत आहेत

नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली सर्व साधारण प्रवर्ग म्हणजेच खुला असे आरक्षण सातार नगर परिषदेमध्ये पडले असून सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी कडून दिवसभरात काही संभाव्य नावे चर्चेत राहिली आहेत

साताऱ्याचा विकासाची दूरदृष्टी ठेवून काम करणारालोकप्रतिनिधी यावेळी निवडून देणार असल्याचे ठाम मत काही सातारकर यांनी मांडले असून साताऱ्याचा नगराध्यक्ष विकास कामांबरोबरच लोकांच्या सुखदुःखात येणारा व सध्याच्या घडीला स्वतःच्या प्रभागात निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यालाच साताऱ्याचे नगराध्यक्षपद मिळावे अशी सातारकर यांची इच्छा आहे

काही जुने जाणते नगरसेवकांची नावे इच्छुक यादीमध्ये येत असून. ठराविक युवक यांचेही नाव नगराध्यक्ष पदाचे रेसमध्ये चर्चेत आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हीच अंतिम दोघे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर शिक्का मोर्तब करणार असले तरी नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे आता लक्ष लागले आहे

सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी बरीच माहितीच्या अधिकारातून पोलखोल केली असून मलाही सातारकरयांची संधी करायची असल्याचे मत मोरे सातारानामाशी बोलताना व्यक्त केले त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे हेही नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे

Adv