प्रशासकीय इमारतीसाठी वीस कोटीचा निधी प्राप्त

265
Adv

सातारा नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे सुमारे 60 कोटी अंदाजपत्रकातचे कामास यापूर्वीच सुरुवात झाली असून, सध्या डिप एक्साव्हेशनचे काम पूर्ण होवून पाया बांधकामाचे काम प्रगतीपथावर आहे. या इमारतीच्या कामासाठी राज्याचे मुख्य मंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातुन 20 कोटी रुपयांचा निधीचा भरघोस निधी आजच प्राप्त झाला आहे अशी माहीतीखासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

सातारा नगरपरिषदेची दोन वर्षापूर्वी हद्दवाढ झाली आहे.त्यामुळे सातारा नगरपरिषदेचे क्षेत्र मोठया प्रमाणात विस्तारले जावून ते सुमारे 8 चौ.कि.मी. इतके वाढले आहे.भविष्यात नगरपरिषदेच्या मुख्य कार्यालयाची इमारत निश्चितच अपूरी पडेल या दूरदृष्टीकोनामधुन नवीन प्रशासकीय इमारत उभी करण्याचे
आम्ही नियोजन केले होते. त्यानुसार आमच्या विनंतीला मान देवून, मोठ्या मनाने, जिल्हापरिषदेच्याकार्यालया समोरील सुमारे एक एकर म्हणजेच चाळीस गुंठे जागा श्री. बाबासाहेब कल्याणी यांनी नगरपरिषदेला नाममात्र एक रुपयांच्याखरेदीपत्राने दिली. असे बहुदा अलिकडच्या काळातील एकमेव उदाहरण असेल. त्यामुळे नगरपरिषदेचे कोटयावधी रुपये वाचले आहेत. या प्रशस्त जागेत बहुमजली प्रशासकीय इमारत आता साकारत
आहे. या इमारतीचा आराखडा वास्तुविशारद असलेल्यांकडून स्पर्धात्मक उपक्रम राबवून, स्विकृत करण्यात आलेला आहे. भविष्यातील तंत्रज्ञान, नागरीकांना पुरविल्या जाणा-या सेवा इत्यादीबाबत अतिशय बारकाईने अभ्यास करून, सर्व शक्यता गृहीत धरुन या इमारतीचे बांधकामास सुरुवात देखिल करण्यात आली आहे.

पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांना हवेशीर आणि प्रसन्न वातावरणात नागरीकांच्या प्रश्नांबाबतलोकाभिमुख प्रशासनास उपयुक्त आणि कार्यक्षमता वाढवणारी अंतर्गत रचना, प्रशस्त वाहनतळ, सुसज्य अभ्यागत कक्ष, या इमारतीमध्ये असणार आहे. नागरीकांचे प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी
सन्माननीय नगरसेवकांसाठी अत्याधुनिक व्यवस्थेसह मुख्य सभेचे भव्य सभागृह आणि विषय समितीत्यांसाठीछोटे सभागृह, कॉन्फरन्स रुम,प्रत्येक आघाडी/पक्ष यांचे विचारविनिमयासाठी स्वतंत्र दालन, पदाधिकारी, अधिकारी यांची दालने आदी बाबींचा समावेश आहे.या इमारतीचे बांधकामासाठी वैशिष्टयपूर्ण योजनेमधुन यापूर्वी 10 कोटी निधी मिळालेला आहे. आज
20 कोटी इतका भरीव निधी प्राप्त झाल्याने, इमारतीच्या कामामध्ये अधिक गती येईल. सातारकरांना जास्तीत
जास्त सुविधा निर्माण करुन देताना, शक्यतो शासकीय निधी प्राप्त करुन घेण्यावर आमचा प्रयत्न राहीलाआहे. या प्रयत्नांचा भाग म्हणूनच 20 कोटींचा भरीव निधी प्राप्त झाला आहे. याबद्दल मुख्य मंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांचे आम्ही तमाम सातारकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो असेही शेवटी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

Adv