साताऱ्यातील सर्व गणेश मंडळांच्या मीटिंगचा उद्या शाहूकला मंदिर मध्ये सायंकाळी सहा वाजता पहिला मीटिंगचा श्री गणेशा होणार आहे या मीटिंगमध्ये काय निर्णय होतं त्याकडे गणेश भक्तांचे लक्ष लागले आहे
गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असताना साताऱ्यातील सर्व गणेश मंडळाची गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एकी झाली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते गणेश मंडळांना येणाऱ्या अडी अडचणींवर कशाप्रकारे मात करून साताऱ्यातील सर्व सार्वजनिक मंडळांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात कसा साजरा करावा व काय उपाययोजना करता येथील यासाठी ही मीटिंग घेण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे
गणेश मंडळांपुढे आगमन सोहळा परवानगीसाठी एक खिडकी योजना लाईटच्या संदर्भात असलेल्या अडचणी या गोष्टीवर प्राथमिक चर्चा होणार असल्याचे समजते साताऱ्यातील सर्व गणेश मंडळांनी उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सध्या सोशल मीडियावर करण्यात येत आहे