दैनिक सातारनामाने साताऱ्याला फ्लेक्सचा विळखा का असे गेल्या आठ दिवसापूर्वी वृत्त प्रसारित केले होते शिवतीर्थ परिसरातील तीन पैकी एक फ्लेक्सचे स्ट्रक्चर काढल्याने सातारनामाचे कौतुक होत आहे
चक्क शिवतीर्थ च्या परिसरातच फ्लेक्स चा विळखा झालेला होता दैनिक सातारनामाने या प्रकरणाला वाचा फोडली होती या वृत्तानंतर सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे व माझी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी हे फ्लेक्स स्ट्रक्चर काढले नाही तर आम्ही उखडून टाकू असा इशारा दिला होता आंदोलनाच्या पूर्वीच हे स्ट्रक्चर काढल्याने सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे व माजी नगरसेवक शंकर माळवदे यांच्याही प्रयत्नांना यश आले आहे
छत्रपती शिवराय हेच आमचे दैवत असून यांच्यापेक्षा कोणीही मोठ नाही इथून पुढे कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थ व आसपास परिसरात जर कोणी अनाधिकृत काही करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सांगितले






