रिअल हिरोंचा शिवसेना शहरतर्फे सत्कार

46
Adv

दोन दिवसांपूर्वी करंजे येथे एका अल्पवयीन मुलीला चाकू दाखवून धाक दाखवण्याचा प्रकार घडला. त्यात रिअर हिरो बनून सातारा शहर पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीची सुटका केली. त्या रिअल हिरोंचा शिवसेना शिंदे गटाच्या शहर शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

करंजे येथे साताऱ्यात एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने चाकू हल्ला केला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या हल्यातून त्या मुलीला सुखरूप वाचवण्यात आले. यांनी प्रसंगावधान दाखवून त्या मुलीचा जीव वाचवला व सुटका केली. या तिन्हीचे साताऱ्यात कौतुक होत आहे. यात रिअल हिरो ठरणाऱ्या शिवसेना सातारा शहर संघटक अमोल इंगोले, पोलीस कर्मचारी सागर निकम, धीरज माने यांचा शिवसेना सातारा शहरतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख निलेश मोरे , शहर संघटक किरण कांबळे , उपशहर प्रमुख अमोल खुडे,शुभम भिसे, विक्रांत यादव, शाखा प्रमुख यश खत्री, अनिकेत भिसे , विभाग प्रमुख सयाजी शिंदे उपस्थित होते.

Adv