रणजीत भोसले यांचा अतिउतावळेपणा

583
Adv

छावा पहिला छावा जाणार अशी पोस्ट टाकून कोणाची बरोबरी कोणाशी करतोय याचे भान एकनाथ शिंदेंच्या युवा शिवसेनेला नसल्याचे साताऱ्यात दिसून आले

पालकमंत्री महोदय यांचा शासकीय दौऱ्यात शंभूराज देसाई असा उल्लेख करण्यात येतो मात्र एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांकडून शंभुराजे असा उल्लेख करून छावा पहिला छावा जाणार अशा पोस्ट वायरल करून नक्की कोण कोणाशी बरोबरी करते त्याचे भान ही या पदाधिकाऱ्यांना राहिले नाही

छत्रपती संभाजी महाराजांचा गाजलेला चित्रपट छावा हा सर्वांनी जरूर पाहावा मात्र आपण त्या उंचीचे या देशात कोणीही होऊ शकत नाही याचे भान सर्वांनी राखावे

काय आहे पोस्ट
👇🏻
🙏 *”छावा” पाहायला *”छावा”* जाणार 🙏
युवा सेनेचे नियोजन

*छावा चित्रपटच्या माध्यमातून श्रीमंत छत्रपती शंभूराजे यांना पाहायला मंत्री शंभूराजे यांना घेऊन जाणार* –
*रणजितसिंह भोसले*

जिल्हातील शेकडो युवा सैनिक पदाधिकारी यांना घेऊन आज दुपारी 4 वाजता 7 स्टार येथे छावा या चित्रपटातील श्रीमंत छत्रपती शंभू राजे यांना पाहण्यासाठी सातारा राजधानीचे सुपुत्र नामदार पालक मंत्री श्री शंभू राजे यांना घेऊन जाणार आहोत,

शंभूराजे यांच्या ऊपस्थितीत त्यांच्या समवेत युवा सेनेचे जिल्हातील शेकडो युवक छावा चित्रपट पाहणार आहोत असे नियोजन जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांनी केल आहे…

या साठी युवा सैनिकांच्या आग्रहाला मान देऊन पालकमंत्री स्वतः हा चित्रपट पाहण्यास ऊपस्तीत राहणार आहेत… 🙏 त्याचे स्वागत 🙏व आभार

रणजितसिंह भोसले
युवा सेना जिल्हा प्रमुख
सातारा

Adv