नगरपालिका निवडणुक आली की अनेक जण छत्रीसारखे उगवतात. निवडणुका झाल्या की गायब होतात. आम्ही राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर देणार आहे. आजही प्रभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले असून ते पुढेही सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन निलेश मोरे यांनी केले.
सातारा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक धुमशान सुरू आहे. यात प्रभाग 5 ब मधून शिवसेना शिंदे गटाचे सातारा शहरप्रमुख निलेश मोरे हे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. निलेश मोरे यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय मदत केंद्रातून सातारा शहरासह जिल्ह्यातील रुग्ण व नातेवाईकांना अठरा कोटीहून अधिक मदत मिळवून दिले आहे.
यावेळी मोरे म्हणाले, निवडणुका आल्या की अनेक जण रिंगणात येतात. निवडणुका संपल्या की गायब होतात असे अनेक जण आपल्याला पाहायला मिळतील. आम्ही मात्र प्रभागाचा विकास, जनसेवा यावर भर दिला आहे. गेली दहा वर्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असून 80 टक्के समाजकारण व 20 टक्केच राजकारण केले आहे. त्यामुळे प्रभागातील लोकांनी विचार करणे गरजेचे आहे. प्रभागाच्या व शहराचा विकास आज आमचा ध्यास असल्याचे मोरे यांनी सांगितले. यावेळी अभिषेक बाबर, किशोर माने, अविनाश माने, प्रथमेश बाबर, अमोल इंगवले निरंजन नाईक, सोहील फकीर, प्रतिक काळे, संदेश बाबर, मोनिका माने, विद्या बर्गे, सुरेखा यादव आदी उपस्थित होते.







